मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  VIDEO : “..त्यामुळे मी इम्रान खानवर गोळ्या झाडल्या”, हल्लेखोराने सांगितले गोळीबाराचे कारण

VIDEO : “..त्यामुळे मी इम्रान खानवर गोळ्या झाडल्या”, हल्लेखोराने सांगितले गोळीबाराचे कारण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 03, 2022 10:48 PM IST

इम्रानवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.पाकिस्तानी मीडियानुसार,हल्लेखोराने अटक केल्यानंतर सांगितले की,तो इम्रान खानला मारण्यासाठी आला होता.

हल्लेखोराने सांगितले गोळीबाराचे कारण
हल्लेखोराने सांगितले गोळीबाराचे कारण

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पंजाब प्रांतात गुरुवारी निषेध मोर्चा दरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या पायाला गोळी लागली असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार इम्रानवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, हल्लेखोराने अटक केल्यानंतर सांगितले की,तो इम्रान खानला मारण्यासाठी आला होता. माजी पंतप्रधान जनतेची दिशाभूल करत आहेत,ज्यांना शिक्षा देण्यासाठीतो आला होता.

हल्लेखोराने कबूल केले आहे की, मी फक्त इम्रान खानला मारण्यासाठी आलो होतो. आणखी कुणाला नाही. तेथे अजान सुरू असताना तंबू ठोकून ते लोक आवाज करत होते. मी माझ्या मनातून अचानक हा निर्णय घेतला. ज्या दिवसापासून त्यांनी लाहोर सोडले होते, त्या दिवसापासून त्यांना मारण्याचा माझा विचार होता. माझ्यासोबत कोणीच नाही. त्याने सांगितले की, मी बाईकने आलो होतो आणि ती त्याच्या मामाच्या दुकानात उभी केली होती.

पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, या गोळीबारात एका इम्रान खान समर्थकाचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण जखमी झाले आहेत. डॉन न्यूज टीव्हीने गुरुवारी वृत्त दिले की वजिराबादमधील अल्लाह हो चौकाजवळ PTI अध्यक्ष इम्रान खान यांच्या कंटेनरवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात इम्रान खान थोडक्यात बचावले असले तरी त्यांना दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतर इम्रान खान यांना कंटेनरमधून बाहेर काढून बुलेट प्रूफ कारमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

इम्रान खान यांच्या कंटेनरजवळ झालेल्या गोळीबारात पीटीआयचे नेते फैसल जावेद हेही जखमी झाले आहेत. तेहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) निषेध मोर्चाचा गुरुवारी सातवा दिवस होता.

इम्रान खान यांच्यावरील या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा एकदा रक्तरंजित खेळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यावरही एका रॅलीत आत्मघातकी हल्ला झाला होता ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या आणि त्यांचा मृत्यू झाला होता. सध्या त्यांचा मुलगा बिलावल भुट्टो हे पाकिस्तान सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री आहेत, ज्यांच्या विरोधात इम्रान खान यांनी आंदोलन सुरू केले आहे.

इम्रान यांच्या पक्षाच्या मोर्चाचा आज सातवा दिवस होता.सुरुवातीच्या योजनेनुसार सात दिवसांत इस्लामाबादला पोहोचायचे होते. यापूर्वी मार्च ४ नोव्हेंबरला इस्लामाबादला पोहोचणार होते, पण पीटीआयचे सरचिटणीस असद उमर यांनी सांगितले की, आता हा ताफा ११ नोव्हेंबरला राजधानीत पोहोचेल. इम्रान खान देशात लवकरात लवकर नव्या निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत आणि आपल्या मागण्या घेऊन ते इस्लामाबादच्या दिशेने लाँग मार्च काढत आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग