लग्न समारंभात लष्करी जवानाचा अंदाधुंद गोळीबार, नवरदेवाच्या भावोजीचा पोटात गोळी लागून मृत्यू
पंजाबमध्ये लग्नाच्या आदल्या रात्री घरात नाचगाणी सुरू असताना आर्मी जवान असलेल्या नवरदेवाच्या मावस भावाने अंदाधूंद गोळीबार केला. यात लग्नघरातील जावायाचा मृत्यू झाला.
चंदीगड - पंजाबमध्ये बंदुक संस्कृतीवर नियंत्रण मिळवल्याचे सरकाच्या दाव्याची पुन्हा एकदा पोलखोल झाली आहे. मंगलवार रात्री तरनतारनमधील सीमावर्ती गाव झुग्गिया कालू येथे लग्न समारंभात नवरदेवाच्या मावस भावाने दारूच्या नशेत गोळीबार केला. यामध्ये एक गोळी नवरदेवाच्या बहिणीच्या पतीला लागून त्यांचा मृत्यू झाला. गुरदित्त सिंग (वय ३४, नौशहरा पन्नुआ) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोळीबार करणारा भारतीय लष्करात हवालदार पदावर कार्यरत असून घटनेनंतर फरार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
गाव झुग्गियां कालू येथील माजी सरपंच चानण सिंग यांचा मुलगा धर्म सिंग याचा मंगळवारी विवाह होता. धर्म सिंग याचा मावस भाऊ अमरजीत सिंह उर्फ रवि हा सुद्धा लग्नासाठी आला होता. अमरजीत सिंग भारतीय आर्मीत हवालदार आहे. तो दिल्लीत तैनात आहे. सुट्टीवर असणारा सैनिक अमरजीत सिंग रवि आपल्या वडिलांची डबल बॅरल रायफल सोबत घेऊन लग्नात आला होता.
रात्रीच्या वेळी लग्नघरात सर्वजण नृत्य करत होते. तेव्हा अमरजीत सिंग रवि आपल्या वडिलांच्या परवाना असलेल्या डबल बॅरल रायफलमधून अंदाधूद फायरिंग करू लागला. नवरदेवाचे वडील माजी सरपंच चानण सिंह यांनी त्याला गोळीबार करण्यास मनाई केली मात्र त्याने ऐकले नाही.
एक गोळी चानण सिंग यांचा जावई गुरदित्त सिंग यांच्या पोटातून आर-पार गेली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.