Firenado Seen In Los Angeles Fire : अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत अब्जावधींचे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. या आगीत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या आठवड्यात अग्नि वादळ व उष्ण वारे वाढण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. या आगीत अनेक हॉलिवूड स्टार्सचे बंगलेही जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आगीत आतापर्यंत १२ हजारांहून अधिक घरे जळून खाक झाली आहेत.
दरम्यान, लॉस एंजेलिसमध्ये या भीषण अग्नितांडवात एक धोकादायक 'फायरनेडो' देखील दिसले. या अग्निवादळाचा हा व्हिडिओ शुक्रवारी रात्री शूट करण्यात आला असून तो व्हायरल झाला आहे. फायरनाडो हा शब्द आग आणि टोर्नेडो (चक्रीवादळ) यांचं मिश्रण आहे, ज्याचा अर्थ आगीचे चक्रीवादळ असा होतो. आजूबाजूला वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे जेव्हा पोकळी निर्माण होते, तेव्हा ती अत्यंत शक्तिशाली बनते. अशीच क्रिया आगीदरम्यान वायु एकमेकांना धडकल्याने होते. अशावेळी आगीचा एक चक्रीवादळ दिसू लागतो. हे चक्रीवादळ एक फूट ते १५ फुटांच्या दरम्यान असू शकते.
अनेकदा शक्तिशाली चक्री वादळामुळे झाडे उन्मळून पडतात. तसेच वादळात इमारती व घरे जमिनदोस्त होतात. वेगाने वाहत असलेल्या वाऱ्यामुळे गाड्या घरे ही हवेत उडवली जातात. नॅशनल वेदर सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार, २०१८ नंतरची ही सर्वात भीषण आग आहे. वाऱ्याचा वेग ताशी १४३ किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. अशा परिस्थितीत नुकसानीचे प्रमाण वाढू शकते. काही वेळा वादळामुळे आगीचे गोळे उडून पसरून आग वाढण्याचा धोका जास्त असतो. ही आग रहिवासी भागातही पसरू शकते.
१९२३ मध्ये जपानमध्ये भीषण आग लागली होती. त्यापूर्वी झालेल्या भूकंपानंतर ही आग लागली होती. या आगीत १५ मिनिटांत ३८ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला.
संबंधित बातम्या