Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू

Firecracker Factory fire : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ जणांचा होरपळून मृत्यू

May 09, 2024 10:33 PM IST

Sivakasi Firecracker Factory Fire : तामिळनाडूतील शिवकाशीजवळ एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाने ८ कामगारांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत.

शिवकाशीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट
शिवकाशीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट

Firecracker Factory fire : तामिळनाडू राज्यातील विरुधुनगर जिल्ह्यात गुरुवारी एक फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच महिलांसह ८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना शिवकाशीजवळ (sivakasi Firecracker Factory) सेंगामालापट्टी गावात श्री सुदर्शन फायरवर्क्स कारखान्यात झाला. सरवनन यांच्या मालकीच्या या कारखान्यात ४० हून अधिक वर्किंग शेड आहेत. 

देशाचं फटाका केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवकाशी शहरात ही दुर्घटना घडली आहे. या गावात स्फोटाच्या घटना वारंवार घडत असतात. गुरुवारी दुपारी जेव्हा कर्मचारी वर्किंग शेडमध्ये फॅन्सी फटाके बनवत होते तेव्हा घर्षण झाल्याने त्याचा स्फोट झाला. याची आग आसपासच्या शेडमध्ये पसरली. माहिती मिळताच अग्निशमन दल व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले गेले.

या दुर्घटनेतील जखमींना शिवकाशी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमी झालेल्यांमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगतिले जात आहे. आग लागण्याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या स्फोटानंतर फॅक्ट्रीच्या ७ खोल्यांमध्ये ठेवलेले फटाके जळून खाक झाले आहेत. या फटाका फॅक्ट्रीकडे लायसन्स असल्याची माहितीही समोर येत आहे. 

मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनी म्हटले आहे की, स्फोटात ८ कामगारांच्या मृत्यूची घटना खूपच दु:खद आहे. त्यांनी जखमींवर उपचार व आवश्यक बचाव मोहीम राबवण्याच्या सुचना दिल्या आहेत. 

स्टालिन यांनी म्हटले की, निवडणुकीची आचार संहिता लागू असल्यामुळे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मृत लोकांच्या कुटूंबीयांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल. शिवकाशी भारतातील आतशबाजी निर्माण केंद्राच्या रुपात ओळखले जाते. येथे बनवलेले फटाके, सेफ्टी माचिस आणि स्टेशनरी वस्तू देशभर पाठवल्या जातात.

हैदराबादमध्ये भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू -

हैदराबाद शहरात पावसाने कहर केला असून मुसळधार पावसामुळे बाचुपल्ली भागात निर्माणाधीन अपार्टमेंटची भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये एक चार वर्षांच्या मुलाचा समावेश असल्याचं पोलिसानी सांगितलं. सर्व मृत नागरिक हे ओडिशा आणि छत्तीसगडमधील स्थलांतरित मजूर होते, असं पोलिसांनी सांगितलं.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर