
प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्यातील सेक्टर १८ आणि १९ मध्ये भीषण आग लागली असून यामध्ये अनेक छावण्या (टेंट) जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. तसेच आगीमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
महाकुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग लागल्याने भाविकांची पळापळ झाली. आगीचे वृत्त समजताच पोलिस-प्रशासनात एकच खळबळ उडाली. महाकुंभातील लवकुश धाम कॅम्पमध्ये ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत अनेक तंबूही जळून खाक झाल्याची माहिती आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग कशी लागली? हे समजू शकलेले नाही.
महाकुंभाला आग लागण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी ९ फेब्रुवारीच्या रात्री सेक्टर-२३ मध्ये आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणली. आगीचे कारण गॅस सिलिंडरची गळती असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाकुंभ सुरू झाल्यापासून येथे अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. ३० जानेवारी ला महाकुंभात आग लागली होती. या घटनेत डझनाहून अधिक तंबू जळून खाक झाले. छतनाग घाट नागेश्वर घाट सेक्टर २२ जवळील टेंट सिटीमध्ये ही आग लागली. हा घाट अग्निझुंसी बाजूने छतनागजवळ जत्रेच्या काठावर आहे.
एका खासगी कंपनीने उभारलेल्या वैदिक टेंट सिटीला आग लागली होती. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रमोदकुमार शर्मा यांनी सांगितले की, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आग विझवली. यापूर्वी १९ जानेवारी रोजी गोरखपूरमधील गीता प्रेसच्या कॅम्पला आग लागली होती. त्यानंतर दीडशेहून अधिक कॉटेज जळून खाक झाल्या. शास्त्री पुलाजवळ सेक्टर १९ मध्ये गीता प्रेस कॅम्प उभारण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने छोट्या सिलिंडरमधील गळतीमुळे आग लागल्याचे कारण दिले होते. मात्र, गीता प्रेसने बाहेरून लागलेल्या आगीचे कारण सांगितले होते.
संबंधित बातम्या
