रेल्वे प्रशासनाने होळीनिमित्त अनेक विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. त्यातील लोकमान्य टिळक होळी स्पेशल ट्रेनच्या एसी बोगीला बिहारमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आग लागल्याचे समजताच बोगीतील प्रवाशांमध्ये पळापळ झाल. अनेकांनी ट्रेनमधून उड्या मारून आपला जीव वाचवला. ट्रेनच्या वातानुकूलित बोगीत शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लाग लागली. दानापूर-पंडित दीनदयाल उपाध्याय रेल्वे परिक्षेत्राच्या कारिसाथ स्टेशनजवळ बुधवारी मध्यरात्री ही घटना घडली.
बिहारमध्ये होळी स्पेशल ट्रेनला आग लागली. आग लागलेली होळी स्पेशल ट्रेन (०१४१०) दानापूरहून लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईकडे जात होती. या ट्रेनच्या एसी बोगीला आग लागली. रात्रीच्या वेळी बोगीमध्ये शॉर्ट सर्किट झाले संपूर्ण बोगीत आग पसरली. या बोगीत प्रवाशांची संख्य कमी होती. काही प्रवाशांनी बोगीतून बाहेर उड्या टाकून जीव वाचवला. या घटनेत कोणालाही दुखापत व कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.
ट्रेनमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकाराची चौकशी केली जात आहे. मेन लाईनवरून जात असलेल्या या ट्रेनला आग लागल्याने या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला. आग लागलेली बोगी रेल्वेपासून वेगळी करून ही ट्रेन मुंबईकडे रवाना करण्यात आली.
संबंधित बातम्या