खासगी रुग्णालयात मध्यरात्री भीषण अग्नितांडव, चिमुकल्यासह ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खासगी रुग्णालयात मध्यरात्री भीषण अग्नितांडव, चिमुकल्यासह ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू

खासगी रुग्णालयात मध्यरात्री भीषण अग्नितांडव, चिमुकल्यासह ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू

Dec 13, 2024 08:23 AM IST

Fire in Hospital : तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात लागलेल्या आगीत काही रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एका चिमुकल्यासह सहा जण ठार झाले आहे. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

मध्यरात्री खासगी रुग्णालयात भीषण अग्नितांडव, चिमूकल्यासह ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू
मध्यरात्री खासगी रुग्णालयात भीषण अग्नितांडव, चिमूकल्यासह ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू

Fire in Hospital : तामिळनाडूतील डिंडीगुल जिल्ह्यात गुरुवारी रात्री भीषण आग लागली. येथील एका खासगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत काही रुग्णांचा होळपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका लहान मुलासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. हॉस्पिटलला लागलेल्या आगीचे दृश्य भयावह होते. ही घटना गुरुवारी रात्री १० च्या सुमारास घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिची रोडवरील सिटी हॉस्पिटलमध्ये आग लागली. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. रुग्णालयात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी रुग्णालयाला आग लागली, तेव्हा रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू होते. आगीच्या घटनेनंतर उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन व बचाव दलाचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी त्वरित बचाव कार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं व दवाखान्यातून रुग्णांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. आगीच्या घटनेनंतर काही वेळातच डिंडीगूलचे जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तब्बल ३ तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र तो पर्यंत ७ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता तर काही जण जखमी झाले होते. पोलिस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लिफ्टमध्ये सहा जण बेशुद्धावस्थेत आढळले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उर्वरित रुग्णांना सुखरूप बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

रुग्णालयात आगडोंब उसळला असताना रुग्णालयात अनेक रुग्णांवर उपचार सुरू होते. यावेळी बचाव दलाने यातील २९ रुग्णांना बाहेर काढले. सध्या या दवाखान्यात कुणी अडकून पडले आहे का याची तपासणी केली जात आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याची माहिती मात्र अद्याप समोर आली नाही. आगीच्या कारणाचा शोध घेतला जातोय.

या घटनेबाबत डिंडीगूलचे जिल्हाधिकारी एमएन पूंगोडी म्हणाले की, गुरुवारी रात्री १० च्या सुमारास ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच बचाव दलाने तातडीने रुग्णांना सुखरुपपणे बाहेर काढले. त्यांना जवळच्या दवाखान्यात दाखल करण्यात आलंय.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर