Bhushan Singh : मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह विरोधात दोन FIR, पोस्को अंतर्गतही गुन्हा दाखल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bhushan Singh : मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह विरोधात दोन FIR, पोस्को अंतर्गतही गुन्हा दाखल

Bhushan Singh : मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह विरोधात दोन FIR, पोस्को अंतर्गतही गुन्हा दाखल

Published Apr 29, 2023 12:18 AM IST

brijBhushansingh :भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरोधात कथित आरोपाप्रकरणी दिल्ली पोलिसांत दोनएफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

brij Bhushan singh
brij Bhushan singh

Bhushan Sharan Singh : ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी दोन  एफआयआर दाखल केले आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण याच्या विरोधात महिला खेळाडूंनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात ब्रिजभूषण यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सांगितले जात आहे की, अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, पहिला गुन्हा अल्पवयीन मुलीच्या आरोपासंबंधित नोंद आहे. याअंतर्गत लैंगिक शोषण संरक्षण (पोक्सो) कायद्यासग भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 

भारतीय कुस्ती महासंघाचे  अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह याच्याविरोधात कथित आरोपाप्रकरणी दिल्ली पोलिसांत दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. भारतीय महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर दिल्लीतल्या कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. पहिला एफआयआर अल्पवयीन मुलीद्वारे करण्यात आलेल्या आरोपसंदर्भात आहे. याचप्रकरणात पोक्सोअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरा एफआयआर महिला कुस्तीपटूंनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नोंदवण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणात गंभीर दखल घेण्यात आली आहे. 
दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टात याप्रकरणी माहिती दिली होती. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात सात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी कोर्टात सांगितलं होतं. कुस्तीपटूंच्यावतीने ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी सीलबंद लिफाफ्यात आपलं म्हणणं कोर्टात ठेवलं. यात तक्रारदार अल्पवयीन मुलीला धोका असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. 

ब्रिजभूषणवर कारवाईची मागणी करत भारताचे आघाडीचे कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी मलिक,  विनेश फोगाट यांच्यासह अनेक कुस्तीपटू दिल्लीतल्या जंतरमंतरवर धरणं आंदोलनासाठी बसले आहेत.  ब्रिजभूषण सिंह यांना सर्व पदांवरुन हटवण्यात यावं आणि त्यांची रवानगी तुरुंगात करावी अशी मागणी कुस्तीपटूंनी केली असून आंदोलनापासून मागे हटणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 

यावर ब्रिजभूषण सिंह यांनी हे प्रकरण सुप्रिम कोर्टात असून कोर्ट जो निर्णय देईल त्याचं आपण स्वागत करु, असं म्हटलंय. पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी म्हटल आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर