मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हुती बंडखोरांवर अमेरिकेचा भीषण एयरस्ट्राईक! ६० ठिकाणे केली उद्ध्वस्त

हुती बंडखोरांवर अमेरिकेचा भीषण एयरस्ट्राईक! ६० ठिकाणे केली उद्ध्वस्त

Jan 13, 2024 01:30 PM IST

us air strikes on houthi rebels : अमेरिकेने हुती बंडखोरांच्या तळांवर शुक्रवारी रात्री भीषण बॉम्बहल्ले केले. यात तब्बल ६० ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती आहे.

us air strikes on houthi rebels
us air strikes on houthi rebels

us air strikes on houthi rebels : अमेरिकन सैन्याने शनिवारी सकाळी येमेनमधील हुती बंडखोरांच्या नियंत्रणाखाली असलेल्या अनेक ठिकाणांवर भीषण एयरस्ट्राईक केला. या हल्ल्यात २८ ठिकाणी असलेली बंडखोरांची ६० तळे उद्ध्वस्त करण्यात आली आहे. लाल समुद्रात ही कारवाई करण्यात आली आहे. येमेनची राजधानी साना येथे असोसिएटेड प्रेसच्या पत्रकारांनी देखील मोठे बॉम्ब स्फोट ऐकले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, याआधी गुरुवारी देखील अमेरिका आणि ब्रिटनने हुती बंडखोरांवर हल्ले केले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Arvind Kejriwal : समन्स वर समन्स! दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना ईडीने पाठवली चौथ्यांदा नोटीस; अडचणीत होणार वाढ

गेल्या काही दिवसांपासून इराण समर्थित हुती बंडखोर हे व्यापारी जहाजांना लक्ष्य बनवत होते. भारतीय समुद्राजवळ देखील या बंडखोरांनी हल्ले केले होते. या वाढत्या घटनेमुळे हुती बंडखोरांवर वचक बसवण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनने बंडखोरांच्या तळावर हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या नौदलाने शुक्रवारी लाल समुद्रात आणि एडनच्या आखातातील येमेनच्या आसपासचा भागात असणाऱ्या अमेरिकन नौदलाच्या लढाऊ विमानांना हल्ले करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ७२ तासात मोठे हल्ले करण्यात आले आहेत.

Pune To Lonawala पुणे-लोणावळा नवी लोकल सुरु! शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार गाडी; 'या' आहेत वेळा

इस्रायल आणि गाझा संघर्षामुळे इराण समर्थित हुती बंडखोर व्यापारी जहाजांना लक्ष्य करत होते. यामुळे अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना हुती बंडखोरांवर हा पलटवार केला आहे. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान पाच जण ठार झाले आणि सहा जण जखमी झाले.

दरम्यान हुती बंडखोरांचे लष्करी प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारीने अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. माजी यूएस गुप्तचर अधिकारी एलिसा स्लॉटकिन यांनी अमेरिकेच्या हल्ल्यांचे स्वागत केले परंतु इराणला या हल्ल्यात अमेरिकेला ओढायचे आहे. त्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

या बाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, या हल्ल्यातून इराणला योग्य संदेश देण्यात आला आहे. हुती बंडखोरांवर असे हल्ले सुरूच राहील असे देखील ते म्हणाले. हुती बंडखोरांना आर्थिक मदत करणाऱ्या इराणस्थित सैद अल-जमालच्या वतीने इराणी माल हलवल्याबद्दल हाँगकाँग आणि संयुक्त अरब अमिरातीमधील दोन कंपन्यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत. या कंपन्यांच्या चार जहाजांवरही बंदी घालण्यात आली आहे. इराणने ओमानच्या आखातात तेल टँकर ताब्यात घेतल्याचे फुटेज जारी केले आहे. हे एकेकाळी तेहरान आणि अमेरिका यांच्यातील यांच्यातील वादाचे केंद्र आहेत.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग