कॉलेज कॅम्पस बनला WWE चा आखाडा; तरुणींमध्ये जोरदार हाणामारी, पाहा Viral VIDEO
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  कॉलेज कॅम्पस बनला WWE चा आखाडा; तरुणींमध्ये जोरदार हाणामारी, पाहा Viral VIDEO

कॉलेज कॅम्पस बनला WWE चा आखाडा; तरुणींमध्ये जोरदार हाणामारी, पाहा Viral VIDEO

Dec 22, 2024 04:09 PM IST

Girls Fight Video : व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला एक गुलाबी हुडी परिधान केलेली मुलगी सफेद टॉप परिधान केलेल्या दुसऱ्या मुलीला मारहाण करताना दिसत आहे.

कॉलेजमध्ये तरुणींमध्ये जोरदार हाणामारी
कॉलेजमध्ये तरुणींमध्ये जोरदार हाणामारी

Girls Fight Video:सोशल मीडियावरसध्या ग्रेटर नोएडा येथील एका कॉलेजमधील मारहाणीचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, दोन तरुणी एकमेकींचे केस पकडून मारहाण करत आहेत. ही घटना ग्रेटर नोएडा येथील ग्रेटर नोएडा इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट (GNIM) कॉलेजमधील असल्याचे सांगितले जात आहे. मुलींमधील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हे पाहून सर्वजण अचंबित झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ दिल्ली एनसीआरच्या नॉलेज पार्क येथे असलेल्या एका कॉलेजमधील आहे. या कॉलेजमध्ये दोन मुलींमध्ये तुफान हाणामारी झाली. ही घटना कॉलेज कॅम्पसमध्येच झाली.

व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला एक गुलाबी हुडी परिधान केलेली मुलगी सफेद टॉप परिधान केलेल्या दुसऱ्या मुलीला मारहाण करताना दिसत आहे. गुलाबी हुडी घातलेली मुलगी दुसऱ्या मुलीचे केस पकडून तिला रस्त्यावर पाडते व एकामागे एक थप्पड लगावताना दिसत आहे.

तरुणींमध्ये जोरदार हाणामारी -

गुलाबी हुडी घातलेली तरुणी मारत असताना दुसरी मुलगी जमिनीवर पडलेले दिसते. दरम्यान काही वेळानंतर तेथे अन्य काही मुली जमा होतात व दोघींमधील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र गुलाबी हुडी घातलेल्या तरुणीचा पारा इतका चढलेला असतो की, ती थांबण्याचे नावच घेत नाही व जमिनीवर पडलेल्या मुलीला मारतच राहते. त्यानंतर हा व्हिडिओ संपतो.

का झाली हाणामारी?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, कशा प्रकारे दोन मुली एकमेकींचे केस पकडून हाणामारी करत आहेत. दोघींची हाणामारी तेथे उभे असलेले लोकही पाहत आहेत. सांगितले जात आहे की, ही हाणामारी कोणत्या सामानासाठी नव्हे तर मुलासाठी होत आहे. मात्र या घटनेचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या व्हिड़िओने लोकांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे.

दोन मुलींमधील मारहाणीचा हा व्हिडिओ@GreaterNoidaW नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांची करमणूक होत असून हा व्हिडिओ अन्य अनेक अकउंटवरूनही शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर प्रतिक्रियाही दिली आहे. हा व्हिडिओ पाहून एका यूजरने लिहिले की, किती क्यूट दिसता, अन्य एका यूजरने म्हटले की, मुलींच्या भांडणात केस पकडणे असतेच. अशाच प्रकारचे खूप कमेंट या व्हिडिओवर आले आहेत.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर