Guwahati Agartala Flight : उडत्या विमानात तुफान राडा; प्रवाशांकडून आरोपीला बेदम मारहाण, पाहा VIDEO
Guwahati to Agartala Flight : दारू पिऊन विमानात गोंधळ घातल्याचा आरोप करत प्रवाशांनी एका आरोपीला तुफान बदडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Guwahati Agartala Flight Viral Video : गेल्या काही महिन्यांपासून भारतासह विदेशात विमानांमध्ये हाणामारी किंवा किसळवाण्या घटना घडत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळं अनेकांनी चिंता व्यक्त करत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. त्यातच आता एका इंडिगोच्या विमानात आरोपीने दारू पिऊन गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आरोपीने दारू पिऊन आपातकालीन दरवाजाचा उघडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला आहे. त्यामुळं आता या घटनेचा व्हिडिओ अनेकांनी सोशल मीडियावर शेयर करत हाणामारी करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईची मागणी केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, आसामच्या गुवाहाटीहून आगरतळ्याला निघालेल्या इंडिगो कंपनीच्या विमानात एका प्रवाशाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अंमली पदार्थाचं सेवन करत आरोपी प्रवाशाने आपातकालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचं सहप्रवाशांनी केला आहे. त्यानंतर विमानातील अनेक प्रवाशांनी एकत्र येत आरोपी प्रवाशाला बेदम मारहाण केली आहे.
सहप्रवाशांनी संबंधित प्रवाशाला मागे खेचत लाथा-बुक्कांनी मारहाण केली आहे. विमानातील क्रू मेंबर्सनी आरोपी प्रवाशाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीदेखील सहप्रवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आरोपीला मारहाण करण्यात आल्यानंतर इंडिगोच्या विमानात एकच गोंधळ उडाला.
सहप्रवाशांनी आरोपी प्रवाशाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्यानं विमानातील अनेक प्रवाशांना घाम फुटला. क्रू मेंबर्संनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु विमानात हाणामारी सुरू असताना कुणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. ४१ वर्षीय आरोपी देवनाथ हा गुवाहाटी-आगरतळा विमानातून प्रवास करत होता. त्यावेळी त्याने आपातकाळी द्वार उघडण्याचा प्रयत्न केला. याशिवाय क्रू मेंबर्सशी गैरवर्तन केलं. हाणामारीच्या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती त्रिपुरा पोलिसांचे प्रवक्ते ज्योतिस्मान दास चौधरी यांनी दिली आहे.
विभाग