एयर इंडियाच्या विमानात प्रवाशांमध्ये तूफान हाणामारी! हात ठेवण्याच्या जागेवरून झाला वाद
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एयर इंडियाच्या विमानात प्रवाशांमध्ये तूफान हाणामारी! हात ठेवण्याच्या जागेवरून झाला वाद

एयर इंडियाच्या विमानात प्रवाशांमध्ये तूफान हाणामारी! हात ठेवण्याच्या जागेवरून झाला वाद

Published Dec 23, 2024 11:49 AM IST

Fight Between Passengers In Air India Plane : केबिन क्रू जेवण आणि पेय पदार्थांचे वाटप करत असतांना इकॉनॉमी क्लासमध्ये हात ठेवण्याच्या जागेवरून दोन प्रवाशांमध्ये विमानातच तुंबळ हाणामारी झाली.

एयर इंडियाच्या विमानात प्रवाशांमध्ये तूफान हाणामारी! हात ठेवण्याच्या जागेवरून झाला वाद
एयर इंडियाच्या विमानात प्रवाशांमध्ये तूफान हाणामारी! हात ठेवण्याच्या जागेवरून झाला वाद

Fight Between Passengers In Air India Plane : डेन्मार्कमधील कोपनहेगनहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील दोन प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.  रविवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना हात ठेवण्याच्या  जागेवरून हा वाद झाला. ही विमान दिल्ली विमानतळावर सकाळी ७.  वाजून ३५ मिनिटांनी हे विमान उतरले. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी कोपनहेगन-दिल्ली विमानातील प्रवाशांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता, जो नंतर मिटला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केबिन क्रू जेवण व शीतपेय प्रवाशांना देत होते. यावेळी  इकॉनॉमी क्लासमधील जागेवरून दोन प्रवाशांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यानंतर केबिन क्रूने एका प्रवाशाला दुसरी सीट देऊन शांत केले. मात्र, विमान दिल्लीत उतरणार असताना हा प्रवासी आधी बसलेल्या सीटवरून सामान घेण्यासाठी आला. यावरून दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झाले. यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली.  

विमान कंपनीने काय म्हटले ? 

एआय १५८ (कोपनहेगन-दिल्ली) बोईंग ७८७-८ या विमानातील प्रवाशांची संख्या किती होती या बाबत माहिती मिळू शकली नाही.  मात्र, विमान जवळपास पूर्ण भरल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत एअर इंडियाच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत  माहिती दिली की,  दोन्ही प्रवाशांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता.  मात्र काही वेळाने हा वाद  सामंजस्याने मिटवण्यात आला. विमानतळावरून निघण्यापूर्वी दोन्ही प्रवाशांनी  हस्तांदोलन करत एकमेकांना अलविदा केला.  '

दरम्यान, गेल्या काही दिवसांनपासून विमानात प्रवाशांमध्ये वादाच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. किरकोळ कारणावरून हे वाद झाले आहेत. तर काही विभात्स घटना देखील घडल्या आहेत. एका प्रवाशाने विमानातच लघवी केल्याचा प्रकार घडला होता. तर काहींनी अश्लील कृत्य देखील केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी विमान क्रू मेंबरने कारवाई देखील केली आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी ठोस नियमावलीची मागणी काही प्रवाशांनी केली आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर