लालू यादवांना बेल मिळताच विधानसभेत आमदारांमध्ये धुमश्चक्री; धक्काबुक्की करत एकमेकांवर लाडू फेकले!-fight between bjp and rjd mlas after lalu yadav bail in bihar vidhan sabha today ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  लालू यादवांना बेल मिळताच विधानसभेत आमदारांमध्ये धुमश्चक्री; धक्काबुक्की करत एकमेकांवर लाडू फेकले!

लालू यादवांना बेल मिळताच विधानसभेत आमदारांमध्ये धुमश्चक्री; धक्काबुक्की करत एकमेकांवर लाडू फेकले!

Mar 15, 2023 07:22 PM IST

Lalu Yadav Bail : राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादवांना आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कोर्टानं जामीन मंजुर केला. त्यानंतर भाजप आणि राजदच्या आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.

Bihar Vidhan Sabha Political Drama
Bihar Vidhan Sabha Political Drama (HT)

Bihar Vidhan Sabha Political Drama : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांची पत्नी राबडी देवी यांना आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी कोर्टातून जामीन मिळाल्यानंतर बिहारच्या विधानसभेत भाजप आणि राजदच्या आमदारांमध्ये तुफान राडा झाला आहे. लालूंना बेल मिळाल्यानंतर राजदच्या आमदारांनी भाजप आमदारांना पेढे देण्यास सुरुवात केली. परंतु भाजप आमदारांनी पेढे घेण्यास नकार दिल्यामुळं आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. त्यानंतर राजदच्या आमदारांनी चक्क विधानसभेत भाजपच्या आणदारांच्या दिशेनं पेढे भिरकावले. त्यामुळं सभागृहात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळं आता यावरून भाजप आणि राजदमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगलेल्या आहेत.

लालू यादव यांना कोर्टानं जामीन मंजूर केल्यानंतर राजदच्या आमदारांनी आमच्या आमदारांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. याशिवाय काही आमदारांनी आमच्या अंगावर पेढे फेकल्याचा आरोप भाजपा नेते आणि बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय कुमार सिन्हा यांनी केला आहे. याशिवाय आमच्या वरिष्ठ नेत्यांना धक्काबुक्की करण्यात आली असून मुख्यमंत्री नितीश कुमार हे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांनी केला आहे. तर दुसरीकडे राजदच्या नेत्यांनी भाजपच्या आरोपांचं खंडन केलं आहे. नितीश-तेसस्वी सरकारकडून या प्रकरणावर अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

एका आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात दिल्लीतील कोर्टानं लालू यादव आणि राबडी देवी यांच्यासह १४ जणांना जामीन मंजुर केला आहे. त्यानंतर त्याचे राजकीय पडसाद बिहारच्या विधानसभेतही पाहायला मिळाले. त्यामुळं आता आमदारांमधील धक्काबुक्कीच्या या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारच्या विधानसभेत आमदारांमध्ये तुफान राडा झाला होता. त्यानंतर आता भाजप आणि राजदचे आमदार पुन्हा भिडल्यामुळं बिहारमध्ये खळबळ उडाली आहे.

Whats_app_banner