मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral news : पाचवीच्या विद्यार्थ्यावर शिक्षिका करत होती बलात्कार! आईने पकडले रंगेहात! काही दिवसात होणार होते लग्न

Viral news : पाचवीच्या विद्यार्थ्यावर शिक्षिका करत होती बलात्कार! आईने पकडले रंगेहात! काही दिवसात होणार होते लग्न

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 12, 2024 11:28 AM IST

female teacher 5th standard student : एका महिला शिक्षिकेला ५वीच्या मुलांवर अत्याचार करतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. मुलाच्या आईंने या शिक्षिकेला पकडले असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

 एका महिला शिक्षिकेला ५वीच्या मुलांवर अत्याचार करतांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
एका महिला शिक्षिकेला ५वीच्या मुलांवर अत्याचार करतांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

female teacher 5th standard student : एका महिला शिक्षिकेला ५वीच्या मुलांवर अत्याचार करतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. मुलाच्या आईंने या शिक्षिकेला पकडले असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या काही महिन्यांतच या शिक्षिकेचे लग्न होणार होते. या दोघांमध्ये अनेकदा तासनतास गप्पा होत होत्या. या महिला शिक्षिकेला अटक करण्यात आली असून यानंतर तिची २१ लाखांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. ही शिक्षिका शाळेच्या मधल्या सुट्टीच्या वेळेत मुलाशी लैंगिक संबंध ठेवत होती.

ट्रेंडिंग न्यूज

Elon Musk : इलॉन मस्कचा भारतीयांना दणका! ३० दिवसांत १.८५ लाखांहून अधिक 'एक्स' अकाऊंट बंद! 'ही' चूक करणे टाळा

ही घटना अमेरिकेतील आहे. सीबीएस न्यूज मिनेसोटाच्या रिपोर्टनुसार, मॅडिसन बर्गमन असे या महिला शिक्षिकेचे नाव आहे. तिने ११ वर्षाच्या मुलासोबत शारीरिक संबंध ठेवले असल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिक्षिकेचे तीन महिन्यांनी लग्न होणार होते. मुलाच्या आईने त्याला फोनवर बर्गमनशी बोलताना ऐकले. यानंतर आईने त्याचा फोन हिसकावून घेतला. मुलाच्या आई-वडिलांनी दोघांचे मेसेज तपासले. तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. या मेसेजच्या प्रिंट आउट त्यांनी शाळेत घेऊन गेल्या. तसेच मधल्या सुट्टीच्यावेळी मुलाचा शोध घेत असतांना दोघांनाही शरीर संबंध ठेवत असतांना मुलाच्या आईने रंगेहात पकडले.

मोदींनी महाराष्ट्राचं प्रेम अनुभवलंय! आता शाप काय असतो तो अनुभवावा; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

पोलिसांना सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार मेसेजमध्ये बर्गमनचे आणि मुलाचे मेसेज सापडले आहेत. ज्यामध्ये दुपारच्या जेवणाच्या वेळी किंवा शाळेनंतर वर्गात ती मुलासोबत सेक्सवर चर्चा करत होती. तसेच मुलासोबत ती शरीर संबंध ठेवत होती.

मुलाने तपासकर्त्यांना सांगितले की तो मॅडिसन बर्गमनशी जवळजवळ दररोज बोलत होता. हिवाळ्याच्या सुट्टीत तो तिच्या आणि त्याच्या आईसोबत Afton Alps मध्ये स्कीइंगला गेला तेव्हा त्याला तिचा नंबर मिळाला. शिक्षिकेने सहलीदरम्यान त्याला नंबर देण्याचे मान्य केले. ज्या महिन्यात ती स्कीइंग ट्रिपला गेली होती. तर काही महिन्यात बर्गमन ही तिच्या प्रियकराशी लग्न करणार होती.

बर्गमनच्या बॅकपॅकमध्ये मुलाचे नाव आणि अनेक हस्तलिखित लेटर्स असलेले एक फोल्डर सापडले. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले की तो आणि बर्गमनने दिवसभर एकमेकांना लेटर्स लिहित होते. यात दोघांनी एकमेकांना किस केल्याचा देखील उल्लेख आहे. या प्रकरणी पोलिसांनी बर्गमनला अटक केली होती. बर्गमनचे तीन महिन्यांनी जुलैमध्ये लग्न होणार होते. बर्गमनला अटक झाल्यावर न्यायालयात हजर करण्यात आले. तिला २५,००० डॉलर्स म्हणजेच अंदाजे २१ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले आणि सांगितले की, या बातमीने त्यांना मोठा धक्का बसला आहे.

IPL_Entry_Point

विभाग