कठीण काळात घाबरल्याने गोष्टी अजून बिगडू शकतात. मात्र काही लोक असे असतात कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी डोकं शांत ठेऊन पसिस्थिती हाताळतात. असाच एक प्रकार दिल्ली एअरपोर्टमधून समोर आला आहे. दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल २ च्याफूड कोर्ट परिसरात एका वृद्धाला अचानक हार्ट अटॅक आला. वृद्ध जागीच कोसळल्यानंतर तेथे उपस्थित असलेली एक महिला डॉक्टर धावत वृद्ध व्यक्तीजवळ आली. महिला डॉक्टर वृद्धाला CPR देऊ लागली. जवळपास ५ मिनिटांपर्यंत CPR दिल्यानंतर वृद्धाला शुद्ध आली.
घटनेचा व्हिडिओ एअरपोर्टवर उपस्थित असलेल्या कोणीतरी बनवला व तो सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर गतीने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स वर दिव्या गंडोत्रा टंडन यांनी आपल्या अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, बेशुद्ध पडलेल्या एका वृद्धाला महिला डॉक्टर CPR देत आहे. काही वेळापर्यंत सतत सीबीआर दिल्यानंतर वृद्ध व्यक्ती शुद्धीवर येतो. हे पाहून घटनास्थळी उपस्थित असलेले लोक महिला डॉक्टरसाठी टाळ्या वाजवतात. व्हायरल व्हिडिओ पाहून इंटरनेट यूजर्स महिला डॉक्टरचे कौतुक करत आहेत. लोकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहणाऱ्या डॉक्टरांच्या समर्पण सेवाभावाचे यूजर्स कौतुक करत आहेत.
ही घटना दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे. ही घटना १४ जुलै रोजीची असल्याचे सांगितले जाते. या दिवशी हा वृद्ध व्यक्ती एअर इंडियाची फ्लाइट ६E २०२३ ने दिल्लीहून भुवनेश्वरला जात होती. त्यांच्या फ्लाइटची वेळ सायंकाळी साडे पाच वाजताची होती. हा व्यक्ती फ्लाइटच्या बोर्डिंगसाठी फूड कोर्ट परिसरात आला होता. तेव्हा अचानक ते बेशुद्ध होऊन पडले. या वृद्धाची अवस्था पाहून आजूबाजूचे नागरिक गोंधळले. तेव्हा तेथे मेदांता हॉस्पिटलमधील महिला डॉक्टर तेथे उपस्थित होती. तिने वेळ न दवडता वृद्धाला CPR द्यायला सुरूवात केली. डॉक्टर तरुणीने दिलेल्या सीपीआरचा सकारात्मक परिणाम झाला आणि काही वेळाने हार्ट ॲटॅक आलेल्या वृद्धाला शुद्ध आली.
घाईगडबडीत अनेकदा अशा घटनांकडे प्रवाशी दुर्लक्ष करून पुढे जातात. मात्र नवी दिल्ली येथील विमानतळावर डॉक्टर तरुणीने प्रसंगावधान दाखवत एका व्यक्तीचे प्राण वाचवल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
संबंधित बातम्या