मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  chhapra doctor news : संतप्त महिला डॉक्टरनं नगरसेवक प्रियकराचं गुप्तांग कापलं! कारण वाचून हैराण व्हाल!

chhapra doctor news : संतप्त महिला डॉक्टरनं नगरसेवक प्रियकराचं गुप्तांग कापलं! कारण वाचून हैराण व्हाल!

Jul 02, 2024 10:05 AM IST

chhapra doctor cuts off boyfriends genitals : बिहारच्या छपरा जिल्ह्यात महिला डॉक्टर व वॉर्ड कौन्सिलरच्या अफेअरची मोठी चर्चा असून महिला डॉक्टरने काही कारणांवरून नगरसेवक प्रियकराचे गुप्तांग कापले.

संतप्त महिला डॉक्टरनं नगर सेवक प्रियकराचं गुप्तांग कापलं! कारण वाचून व्हाल हैराण
संतप्त महिला डॉक्टरनं नगर सेवक प्रियकराचं गुप्तांग कापलं! कारण वाचून व्हाल हैराण

female doctor cut off genitals of her lover in chhapra : बिहारमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची मोठी चर्चा संपूर्ण राज्यात आहे. ही घटना सोशल मिडीयावर देखील व्हायरल झाली आहे. बिहारमधील छपरा येथे एका महिला डॉक्टरने तिच्या नगरसेवक असलेल्या प्रियकराचे गुप्तांग कापलं आणि टॉयलेटमध्ये फ्लश केलं. 

ही घटना सोमवारी (१ जुलै) घडली. मधौरा येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर अभिलाषा कुमारी व नगरसेवक प्रियकर वेद प्रकाश यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, लग्नाला नकार दिल्याने अभिलाषा कुमारीने वेद प्रकाश याचे गुप्तांग कापले.

ट्रेंडिंग न्यूज
हिला डॉक्टरनं नगर सेवक प्रियकराचं गुप्तांग कापलं! कारण वाचून व्हाल हैराण
हिला डॉक्टरनं नगर सेवक प्रियकराचं गुप्तांग कापलं! कारण वाचून व्हाल हैराण

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि १ जुलै) दुपारी आरोपी महिला डॉक्टरने हे कांड केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वॉर्ड कौन्सिलरला रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती ही चिंताजनक असल्याने त्याला डॉक्टरांनी दुसऱ्या दवाखान्यात भरती करण्यास सांगितले. त्यानुसार त्याला पाटणा येथील सृष्टि हॉस्पिटल या दवाखान्यात हलवण्यात आले आहे.

 

पोलिस आणि माध्यमांसमोर दिली गुन्ह्याची कबुली

आरोपी महिला डॉक्टर अभिलाषा कुमारी हिने या घटनेनंतर स्वत: पोलीस आणि माध्यमांसमोर येत तिने प्रियकरांचे गुप्तांग कापल्याची कबुली दिली. तिने सांगितले की, तिचे आणि वेद प्रकाशचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. वेदप्रकाशसोबत नेहमीच तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. दोघेही सोमवारी लग्न कारणार होते. पण, वेद प्रकाशने ऐनवेळी नकार दिल्याने तिने त्याचे गुप्तांग कापले. त्याने अनेकवेळा लग्नाला नकार दिल्याचे देखील तिने सांगितले. तिच्या या कबुलीमुळे पोलिस देखील चक्रावले आहेत.

लग्नावरून झाला वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिलाषा आणि वेद प्रकाश हे दोघेही लग्न करणार होते. तसे दोघांनी ठरवले देखील होते. मात्र, वेदप्रकाशने नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या अभिलाषाने वेद प्रकाशचे गुप्तांग कापले आणि ते टॉयलेटमध्ये फ्लश केले. या प्रकारची चर्चा सोशल मिडियावर सुरू असून ही बातमी व्हायरल झाली आहे. या बतमीवर अनेकांनी कमेन्ट देखील दिल्या आहेत.

WhatsApp channel
विभाग