Cyber Crime: फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन या जगातील सर्वात मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनीने लोकांना कुरियर स्कॅमबाबत सतर्क राहण्याचा इशार दिला. फेडएक्सच्या कर्मचाऱ्यांच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन फेडएक्स यांच्याकडून करण्यात आले.
गेल्या काही वर्षात आर्थिक फसवणुकीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. सायबर गुन्हेगार नोकरीचे, लग्नाचे, लॉटरीचे आमिष दाखवून नागरिकांची लूट करत आहेत. अशातच फेडएक्स कर्मचाऱ्यांच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले. दरम्यान, कशा पद्धतीने ही फसवणूक केली जाते आणि अशा फसवणुकीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजेत, त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
हे घोटाळेबाज आपण फेडएक्सचे प्रतिनिधी असल्याचा बनाव करतात आणि तुमच्या पार्सलमध्ये अवैध वस्तू आहेत, असा आरोप करून लोकांना आपल्या जाळ्यात अडकवतात. तसेच तोतया अधिकाऱ्याशी गाठ घालून नागरिकांना अटकेची धमकी देतात. अटकेपासून वाचण्यासाठी नागरिकांकडून पैशांची मागणी केली जाते. अनेकदा लोक बदनामी किंवा अटकेच्या भितीने त्यांना पैसेही पाठवतात. त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारचा मेसेज, इमेल किंवा ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल आल्यास नागरिकांनी सावधान राहावे.
फेडएक्स कोणत्याही अनाहूत ईमेल, ईमेल किंवा टेक्स्ट मेसेज द्वारे तुमच्या खात्याची किंवा ओळखीसंबंधी व्यक्तिगत माहिती मागत नाही. फेडएक्स कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांशी संबंधित नाही आणि त्यांच्या वतीने कार्यवाही देखील करत नाही. कुरियर सेवांचे प्रतिनिधित्व करण्याचे नाटक करणाऱ्यांपासून किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांपासून सावध रहा. धमकी किंवा संदिग्ध विनंतीला प्रतिसाद देताना पैसे हस्तांतरित करू नका. अशा एखाद्या फसवणुकीला बळी पडल्यास १९३० वर कॉल करून किंवा सायबरक्राईम.जीओव्ही.इन (cybercrime.gov.in) ला भेट देऊन त्याबद्दल कळवा.
- फेडएक्स किंवा इतर कुरियर प्लॅटफॉर्मचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करून केल्या जाणाऱ्या कम्युनिकेशनबाबत नेहमी सतर्क रहा.
- संदिग्ध मेसेज किंवा कॉल्स अधिकृत ग्राहक सेवा चॅनल्सकरवी पडताळून घ्या.
- स्रोताची पडताळणी केल्याशिवाय कधीच पैसे हस्तांतरित करू नका किंवा व्यक्तिगत माहिती देऊ नका.
- स्थानिक कायदा अंमलबजावणीशी संपर्क साधा किंवा 1930 वर किंवा सायबरक्राईम.जीओव्ही.इन (cybercrime.gov.in) वर सायबर क्राइम हेल्पलाइनद्वारे घोटाळ्यांची नोंद/तक्रार करा.
संबंधित बातम्या