प्रत्येकानं फोन बंद ठेवा! लेबनॉनमध्ये इस्रायलची दहशत; मोबाईल फोनला हात लावण्यासही घाबरू लागले नागरिक-fear in lebanon due to israel pager and walkie talkie attack ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  प्रत्येकानं फोन बंद ठेवा! लेबनॉनमध्ये इस्रायलची दहशत; मोबाईल फोनला हात लावण्यासही घाबरू लागले नागरिक

प्रत्येकानं फोन बंद ठेवा! लेबनॉनमध्ये इस्रायलची दहशत; मोबाईल फोनला हात लावण्यासही घाबरू लागले नागरिक

Sep 19, 2024 11:44 AM IST

lebanon pager explosion : इस्रायलच्या पेजर, वॉकी टॉकी आणि सोलर यंत्रणेत स्फोट झाल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या या हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये भीतीचे वातावरण आहे.

प्रत्येकानं फोन बंद ठेवा! लेबनॉनमध्ये इस्रायलची दहशत; मोबाईल फोनला हात लावण्यासही घाबरू लागले नागरिक
प्रत्येकानं फोन बंद ठेवा! लेबनॉनमध्ये इस्रायलची दहशत; मोबाईल फोनला हात लावण्यासही घाबरू लागले नागरिक (AP)

lebanon pager explosion : इस्रायली लष्कर आणि त्यांची गुप्तचर संस्था मोसाद यांच्या छुप्या कारवायांमुळे त्यांच्या शत्रूल व संपूर्ण जगाला नेहमीच धक्का दिला आहे. लेबनॉनमध्ये सक्रिय असलेल्या हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेने गेल्या एक वर्षापासून हमाससोबतच्या युद्धात उतरल्यावर इस्त्रायल आता दोन आघाड्यांवर घेरला गेल्याचं दिसत होतं. पण इस्रायलने ज्या प्रकारे हायब्रिड युद्धाचा अवलंब करत हिजबुल्लाहवर हल्ले केले आहेत, त्यामुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. मंगळवारी दुपारी लेबनॉनमध्ये एकाच वेळी सुमारे ३ हजार पेजर्सचा स्फोट झाला. या स्फोटांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर १९०० लोक जखमी झाले होते.

यानंतर बुधवारी हिजबुल्लाहशी संबंधित काही जण वापरत असलेल्या वॉकीटॉकीमध्ये देखील स्फोट झाले, ज्यात १४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतांश हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. यानंतर काही फोन आणि सोलर यंत्रणांचा देखील स्फोट झाल्याचे पुढे आहे. या घटनांचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. इस्रायलच्या या हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये दहशतीचे वातावरण आहे. लोक मोबाईलला हात लावायला देखील घाबरू लागले आहेत.

बुधवारी हिजबुल्लाहच्या दोन दहशतवाद्यांना दफन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. यावेळी अचानक पेजर वाजू लागले आणि काही वेळातच मोठा स्फोट झाला. स्फोटांमुळे नागरिक सैरावैरा पळू लागतात. व सुरक्षित स्थळी आसरा शोधतांना दिसत आहे. दरम्यान, शहरात विविध ठिकाणी स्फोटांचे आवाज येत असल्याचे अनेक व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, काही नागरिक एकमेकांना फोन बंद करण्यास सांगू लागले. तर काही जण एकमेकांना फोनची बॅटरी देखील काढण्यास सांगत असल्याचं दिसत आहे. लाऊडस्पीकरद्वारे प्रत्येकाने आपले मोबाईल फोन बंद करून बॅटरी काढण्याची घोषणा देत असल्याचं व्हीडीओत दिसत आहे.

न्यूयॉर्क टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या घटनेनंतर नागरिक एकमेकांची चौकशी करण्यासाठी फोनचा वापर करण्यास घाबरत असल्याचं पुढं आलं आहे. नागरिक एकमेकांना फोन बंद करून सुरक्षित अंतरावर ठेवण्यास सांगत आहेत. लेबनॉनमधील पेजर हल्ल्यामुळे हे दहशतीचे वातावरण पासरलं होत. पेजरनंतर वॉकीटॉकीही फुटू लागल्याने ही भीती आणखी वाढली. सध्या जगभरातील एजन्सी आणि तज्ज्ञ इस्रायलने हे स्फोट कसे घडवून आणले आणि तेही इतके दूर बसून कसे केले असतील याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

Whats_app_banner
विभाग