एफबीआयच्या ‘टॉप टेन मोस्ट वॉन्टेड’ यादीत असलेला भद्रेश कुमार पटेल आहे कोण? काय केलाय गुन्हा?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  एफबीआयच्या ‘टॉप टेन मोस्ट वॉन्टेड’ यादीत असलेला भद्रेश कुमार पटेल आहे कोण? काय केलाय गुन्हा?

एफबीआयच्या ‘टॉप टेन मोस्ट वॉन्टेड’ यादीत असलेला भद्रेश कुमार पटेल आहे कोण? काय केलाय गुन्हा?

Jan 16, 2025 08:53 AM IST

Bhadresh Patel in FBI Most Wanted List : अमेरिकेची जगप्रसिद्ध तपास यंत्रणा असलेल्या एफबीआयच्या यादीत एका भारतीय व्यक्तिचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्यावर मोठं बक्षीस देखील ठेवण्यात आलं आहे.

एफबीआयच्या ‘टॉप टेन मोस्ट वॉन्टेड’ यादीत असलेला भद्रेश कुमार पटेल आहे कोण? काय केलाय गुन्हा?
एफबीआयच्या ‘टॉप टेन मोस्ट वॉन्टेड’ यादीत असलेला भद्रेश कुमार पटेल आहे कोण? काय केलाय गुन्हा?

FBI Most Wanted List : अमेरिकेची जगप्रसिद्ध तपास यंत्रणा असलेल्या एफबीआयच्या यादीत एका भारतीय व्यक्तिचा समावेश करण्यात आला आहे. त्याच्यावर मोठं बक्षीस देखील ठेवण्यात आलं आहे. भद्रेशकुमार चेतनभाई पटेल असे या आरोपीचं नाव आहे. त्याने त्याच्या पत्नीची  निर्घृण हत्या केली असून तो फरार आहे. सध्या एफबीआय त्याचा शोध घेत आहे.

एफबीआयने  फरार भद्रेशकुमार चेतनभाई पटेल याच्यावर बक्षीस देखील ठेवलं आहे.  एफबीआयच्या १० मोस्ट वॉन्टेड फरारांच्या यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत पटेल याच  नाव समाविष्ट करण्यात आलं आहे.  पटेल याचंन वय  ३४ वर्ष असून २०१५  मध्ये त्याने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या  केली होती. या प्रकरणी  अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील न्यायालयाने त्याच्या विरोधात आटक वॉरंट देखील काढलं होतं.  

एफबीआयने ट्विटमध्ये लिहिले की, "वॉन्टेड! सशस्त्र आणि धोकादायक! एफबीआयच्या दहा मोस्ट वॉन्टेड फरारांपैकी एक असलेल्या भद्रेश कुमार चेतनभाई पटेलला शोधण्यात आम्हाला मदत करा. पटेल यांच्याविषयी काही माहिती असल्यास एफबीआयशी संपर्क साधावा. पत्नीच्या निर्घृण हत्येप्रकरणी तो हवा आहे, असे या ट्विटमध्ये पोस्ट करण्यात आलं आहे.  यापूर्वी एफबीआयने भद्रेश कुमार पटेलच्या अटकेची माहिती देणाऱ्यास अडीच लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले होते.

भद्रेशकुमार पटेल यांनी पत्नीची हत्या कशी केली?

भद्रेश कुमार पटेल हा गुजराती  आहे. १२ एप्रिल २०१५ रोजी मेरीलँडमधील हनोव्हर येथील डंकिन डोनट्स स्टोअरमध्ये नाईट शिफ्टदरम्यान पत्नी पलकला त्याने मारहाण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ही घटना अत्यंत क्रूर होती. असे म्हटले जात की, दोघांमधील संबंध चांगले नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, पटेल याने स्वयंपाकघरात पत्नी पलकवर चाकूने अनेक वार केले. यावेळी त्याच्या दुकानासमोर काही  ग्राहक देखील होते. त्याच्या समोरच ही हत्या करण्यात आली. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  

भारतात येण्यावरून झाला वाद 

रिपोर्ट्सनुसार, पलक भारतात परतण्याच्या विचारात होती. दोघांच्याही व्हिसाची मुदत संपायला थोडा अवधी शिल्लक होता. पलक अमेरिकेत राहण्याच्या विरोधात होती. त्याचवेळी भद्रेशकुमार यांना अमेरिकेत राहायचे होते. या वादातून दोघांमध्ये अनेक वाद झाले.

पत्नीच्या हत्येनंतर भद्रेश कुमार फरार आहे. एप्रिल २०१५ मध्ये बाल्टिमोरयेथील अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. पटेल हा न्यू जर्सीच्या हॉटेलमधून नेवार्क रेल्वे स्थानकापर्यंत टॅक्सी चालवताना शेवटचा दिसला होता.  

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर