बाप रे बाप..! वयाच्या ६५ व्या वर्षात ३०५ मुले; वाचा एका ‘बापमाणसा’ची भावुक करणारी कहाणी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बाप रे बाप..! वयाच्या ६५ व्या वर्षात ३०५ मुले; वाचा एका ‘बापमाणसा’ची भावुक करणारी कहाणी

बाप रे बाप..! वयाच्या ६५ व्या वर्षात ३०५ मुले; वाचा एका ‘बापमाणसा’ची भावुक करणारी कहाणी

Updated Jun 16, 2024 04:14 PM IST

Fathersday :उज्जैन शहरापासून २०किलोमीटर अंतरावर अंबोदिया गावातील सेवाधाम आश्रमात ८५० लोक राहतात. यापैकी ३०५ लोकांनी आपल्या आधार कार्डवर वडिलांच्या नावाच्या जागी सुधीर भाई यांचे नाव लावले आहे.

वयाच्या ६५ व्या वर्षात ३०५ मुले;
वयाच्या ६५ व्या वर्षात ३०५ मुले;

फादर्स-डे निमित्त मध्यप्रदेश उज्जैनमधील एका अशा बापाला भेटूयात जे वयाच्या ६५ व्या वर्षी १० वर्षीय बालकापासून ८४ वर्षी वृद्धाचे वडील आहेत. हे आहेत समाजसेवक सुधीर भाई गोयल आहेत व ते २ देशातील २० राज्यात राहणाऱ्या लोकांची वडिलांची भूमिका पार पाडत आहेत. यामध्ये नेपाळ आणि बांग्लादेशसह मध्य प्रदेश, उडिशा, आसाम, पश्चिम बंगाल, गोवा,  जम्मू,  केरळ, दिल्ली, चेन्नई, आंध्र प्रदेश आदि राज्यांचा समावेश आहे. या लोकांनी सर्व सरकारी कागदपत्रांवर वडिलांच्या नावाच्या जागी सुधीर गोयल यांचे नाव लिहिले आहे. सुधीर भाई गोयल एक समाजसेवक आहेत तसेच सेवा धाम आश्रम चालवतात. या आश्रमात ८५० लोक राहतात त्यापैकी ३०५ लोकांनी सुधीर भाई गोयल यांना आपले वडील मानले आहे. त्यांनी आपल्या आधार कार्डवरही त्यांचे नाव लिहिले आहे.

उज्जैन शहरापासून २० किलोमीटर अंतरावर अंबोदिया गावातील सेवाधाम आश्रमात ८५० लोक राहतात. यापैकी ३०५ लोकांनी आपल्या आधार कार्डवर वडिलांच्या नावाच्या जागी सुधीर भाई यांचे नाव लावले आहे. यामध्ये १० वर्षाच्या मुलासह ८४ वर्षीय वृद्धांचा समावेश आहे. हे सर्वजण सुधीर गोयल यांना वडील मानतात तसेच त्यांना पिताजी म्हणूनच संबोधतात. सांगितले जाते की, सुधीर भाई गोयल यांनी एकदा उज्जैनमध्ये मदर टेरेसा यांची भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांचे जीवन बदलले. त्यांनी विचार केला की, परदेशातील आलेली महिला आपले जीवन अशा लोकांसाठी समर्पित करत आहे तर मी का नाही करू शकत. १९८९ मध्ये घरातील दागदागिने आणि बचत केलेल्या पैशातून थोडी जमीन खरेदी करून आश्रमाची सुरूवात केली. त्यानंतर त्यांचा परिवार मोठा होत गेला. यावेळी गोयल यांनी देश-विदेशातील बेघर, दिव्यांग, रस्त्यावर भीक मागणारे महिला-पुरुष यांना आश्रमात आणले व सर्वांना मुलाप्रमाणे सांभाळले. आश्रमात मुले, वृद्ध व महिलांना राहण्यासाठी वेगवेगळ्या विंग बनवल्या आहेत. 

आश्रमातच बनवली स्मशानभूमी, म्हटले मृत्यूनंतरही येथे राहणार –

गोयल यांनी जवळपास ३०० स्क्वेअर फुटाचे एक शेड बनवले आहे. सुधीर यांची इच्छा आहे की, मृत्यूनंतरही ते आपल्या मुलांसोबत येथेच राहणार आहेत. त्यामुळे त्यांनी जिवंत असतानाच आश्रमात आपल्या अंतिम संस्काराची जागा निश्चित केली आहे. येथे त्यांनी आपला मोठा फोटो तेथे लावला आहे. त्यांनी लिहिले की, मी आपले अंतिम स्थान, अंतिम इच्छेनुसार निश्चित केले आहे. जेणेकरून मृत्यूनंतरही मी येथे ऱाहू शकेन. 

८४ वर्षीय वृद्धाला मानले मुलगा -

सुधीर भाई गोयल देशातील कदाचित एकमेव समाजसेवक असतील यांनी ८४ वर्षाच्या वृद्धाला आपला मुलगा मानले आहे. अंकितग्राम, सेवाधाम आश्रमाचे संस्थापक सुधीर भाई गोयल यांचे म्हणणे आहे की, मागील ३५ वर्षात ३ हज़ार लोकांवर त्यांच्या धर्मानुसार अंतिम संस्कार केला गेला तसेच ५ हज़ाराहून अधिक लोकांचे पुनर्वसन केले गेले. या कामात त्यांना पत्नी कांता आणि दोन मुली गौरी गोयल आणि मोनिका गोयल याचं सहकार्य मिळाले.

सुधीर भाई गोयल यांनी सांगितले की, निस्वार्थी भावनेने या आश्रमाची सुरुवात केली होती. आज हा परिवार वाढून ८५० झाला आहे. आपले जीवन लोकांना समर्पित करणाऱ्या सुधीर भाई गोयल यांनी म्हटले की, त्यांनी ५२ हून अधिक मुलीचे कन्यादान केले आहे. आश्रमात अधिकांश लोक असे आहेत, ज्यांच्या कुटूंबीयांनी त्यांना सोडले आहे. त्यातील काही दिव्यांग आहेत.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर