Viral News : बापाला होते पॉर्नचे व्यसन! पोटच्या मुलीवरच केला बलात्कार; विरोध केलाने केली हत्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : बापाला होते पॉर्नचे व्यसन! पोटच्या मुलीवरच केला बलात्कार; विरोध केलाने केली हत्या

Viral News : बापाला होते पॉर्नचे व्यसन! पोटच्या मुलीवरच केला बलात्कार; विरोध केलाने केली हत्या

Jun 22, 2024 08:28 AM IST

Viral News : १३ जून रोजी मियापूरच्या जंगलात कुजलेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. आरोपी वडिलांनी आपल्या मुलीला जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला.

बापाला होते पॉर्नचे व्यसन! पोटच्या मुलीवरच केला बलात्कार; विरोध केलाने केली हत्या
बापाला होते पॉर्नचे व्यसन! पोटच्या मुलीवरच केला बलात्कार; विरोध केलाने केली हत्या

Viral Crime : वडील आणि मुलीचं नातं अतूट असतं. मात्र, एका मद्यपी वडिलांना पॉर्न व्हिडिओ पाहण्याचं व्यसन जडलं होतं. या व्यसनातून त्यानं त्याच्या १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यास सुरुवात केली. मुलीनं याला विरोध केला असता, क्रूर बापानं तिला जंगलात नेऊन तिची  हत्या केली. एवढेच नाही तर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी  मुलगी हरवली असल्याचा बनाव रचत पोलिसांत तक्रारही दाखल केली. आरोपीचे कुटुंब नुकतेच तेलंगणातील महबूबाबाद जिल्ह्यातून मियापूर, हैदराबाद येथे राहायला आले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी सांगितले की, ७ जून रोजी आरोपी हा त्यांच्या १२ वर्षांच्या मुलीला महबूबाबादला जायचे आहे असे सांगितले. आरोपी वाडीलाने मुलीला सकाळी १० च्या सुमारास आईकडे घेऊन जातो, असे सांगून तेथील एका किराणा दुकानातून नेले. यानंतर आरोपीने त्याची कार एका निर्जन भागात पार्क करून आपल्या मुलीला जंगलात घेऊन जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. यानंतर त्याने मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असून तिने विरोध केल्यावरही तिच्यावर जबरदस्ती करून तिचा खून केला.

द हिंदूमधील वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, पॉर्नचे व्यसन असलेल्या आरोपीला त्याच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. मात्र, मुलीने याला विरोध करत आरडाओरडा करत आईला सांगण्याची धमकी दिली. मियापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतापलेल्या आरोपी पित्याने आपल्या मुलीला जमिनीवर ढकलले, त्यामुळे मुलगी जखमी झाली. यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार करत तीच्यावर दगडाने वार करून तिचा खून केला. यानंतर आरोपी फरार झाला.

दरम्यान, मुगली मेली आहे की नाही हे पाहण्यासाठी आरोपी पुन्हा घटनास्थळी परत आला. मुलीचा मृत्यू झाल्याची खात्री केल्यावर तो तेथून परत आपल्या घरी आला. येथे त्याने त्याच्या अंगावरील कपडे बदलले. यानंतर आपली मुलगी हरवल्याचे पत्नीला सांगितले. दोघांनी पोलिसांकडे जात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आणि पोलिसांना तिच्या मुलीचा शोध घेण्याची विनंती केली.

१३ जून रोजी मियापूरच्या जंगलात कुजलेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले आहे. आरोपी आपल्या मुलीसह जंगलात घुसला आणि एकटा निघून गेल्याचे फुटेजमध्ये दिसत होते. चौकशीत आरोपीने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. नंतर त्याला अटक करण्यात आली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर