खळबळजनक! मुलाच्या मोबाइलच्या व्यसनाला कंटाळून वडिलांनी संतापाच्या भरात केली हत्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  खळबळजनक! मुलाच्या मोबाइलच्या व्यसनाला कंटाळून वडिलांनी संतापाच्या भरात केली हत्या

खळबळजनक! मुलाच्या मोबाइलच्या व्यसनाला कंटाळून वडिलांनी संतापाच्या भरात केली हत्या

Nov 17, 2024 08:24 AM IST

Father killed son due to mobile addiction : बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या मोबईलच्या व्यसनाला कंटाळून त्याच्या वडिलांनी संतापाच्या भरात त्याची हत्या केली आहे.

खळबळजनक! मुलाच्या मोबाइलच्या व्यसनाला कंटाळून वडिलांनी संतापाच्या भरात केली हत्या
खळबळजनक! मुलाच्या मोबाइलच्या व्यसनाला कंटाळून वडिलांनी संतापाच्या भरात केली हत्या

Father killed son due to mobile addiction : मुलांचं मोबाइल व्यसन हे पालकांची डोकेदुखी ठरू लागली आहे. याच व्यसनामुळे बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मुलाला मोबाइलचे इकते व्यसन लागले की यामुले वैतागलेल्या आणि संतापलेल्या एका वडिलांनी त्याची हत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मोबाईलचे व्यसन आणि अभ्यासात रस नसल्याच्या वादातून वडिलांनी मुलाची हत्या केली. रवी कुमार असं आरोपी वडिलांचं नाव आहे. तर तेजस कुमार असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. रवीने मुलगा तेजस याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करत केली आणि त्याचे डोके भिंतीवर आपटले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या तेजसचा जागीच मृत्यू झाला. तो तेजस हा इयत्ता नववीत शिकत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरूच्या कुमारस्वामी लेआऊट परिसरात ही घटना घडली. व्यवसायाने सुतार काम करणारे वडील रवी यादव हे मुलाची शैक्षणिक कामगिरी आणि मोबाइलफोनच्या अतिवापरामुळे वैतागले होते. मुलाला मारहाण केली तेव्हा त्याची आई देखील घरीच होती.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, घटनेच्या दिवशी तेजसने वडिलांना मोबाईल दुरुस्त करण्यास सांगितल्यावर रागाच्या भरात वडिलांनी क्रिकेटच्या बॅटने तेजसला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याला मरण केल्यावर त्याची त्याची मान पकडून त्याचे डोके भिंतीवर अनेकदा आपटले. "तू जगला किंवा मेला यामुळं आम्हाला काही फरक पडत नाही' असं म्हणत वडील मुलाला मारहाण करत राहिले.

मृत्यूनंतर नेले दवाखान्यात

मारहाणीमुळे तेजस हा काही वेळाने बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात न नेता घरीच ठेवण्यात आले. सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत गंभीर जखमी झाल्याने त्याला वेदना होत होत्या. यात त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरच त्याचे वडील त्याला रुग्णालयात घेऊन गेले. १५ नोव्हेंबर रोजी डॉक्टरांनी तेजसला मृत घोषित केले.

कुमारस्वामी लेआऊट परिसरात एका शाळकरी मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. घरी पोहोचल्यावर पोलिसांना आढळले की, किशोरचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आधीच तयार होता. कुटुंबीय अंत्यसंस्काराच्या तयारीत गुंतले होते. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालात मुलाच्या डोक्याला गंभीर जखमा आणि शरीरावर अनेक जखमा असल्याचे समोर आले असून, याआधीही त्याला मारहाण करण्यात आल्याचं स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर