Father and children Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच अपघाताचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, ज्यात एक व्यक्ती स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलांना वाचवताना दिसत आहे. दरम्यान, अनेकांनी सुपरहिरो पित्याच्या धाडसाचे कौतूक केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाईकचे लॉक उघडताना दिसत आहे. तर, त्याच्यामागे लहान दोन मुले उभे आहेत. त्यावेळी या मुलांच्या मागून भरधाव वेगात कार येताना या व्यक्तीला दिसते. त्यानंतर हा व्यक्ती क्षणाचाही विलंब न करता स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलांना वाचवतो. या व्यक्तीने एक सेकंदही उशीर केला असता तर मोठी दुर्घटना घडली असते.
@Family_viralvid या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या हा व्हिडिओ पाहून लोक संबधित व्यक्तीचे कौतुक करत आहेत.
संबंधित बातम्या