बिहारमधील जमुई जिल्ह्यात सासरा-सुनेच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार समोर आला आहे. ५५ वर्षीय महिलेला आपल्या पतीच्या सुनेसोबतच्या अवैध संबंधांविरोधात पवित्रा घेणं महागात पडलं आहे. पती, सून आणि मुलाकडून तिचा एवढा छळ झाला की अखेर सासू घर सोडून मुलीच्या घरी जाऊन राहू लागली. कधी-कधी ती आपल्या घरी यायची तेव्हा पती व सुनेचे अवैध नातं पाहून तिचा संताप व्हायचा.
संपतिया देवी असं महिलेचं नाव आहे. कधी-कधी मुलाच्या समोरच रात्रीच्या वेळी पती सुनेच्या खोलीत जात होता. महिलेने विरोध केल्यावर तिला मारहाण केली जायची. एके दिवशी मुलीच्या घरातून ती सासरच्या घरी परतली असता तिने पुन्हा एकदा तिने पती व सूनच्या अवैध संबंधांना विरोध केला. या प्रकरणावरून तिला पुन्हा मारहाण करण्यात आल्याने महिलेने कंटाळून आत्महत्या केली.
५५ वर्षीय संपतिया देवी यांचे पती बलदेव यादव यांचं त्यांच्याच सुनेसोबत गेल्या १० वर्षांपासून अनैनिक संबंध असल्याचा आरोप आहे. पती आणि सून यांच्यातील अवैध संबंधांमुळे संपतिया देवी चिंतेत होत्या. त्यांना नवरा, मुलगा आणि सुनेकडून मारहाण व्हायची.
घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. आसपासच्या लोकांनी सांगितले की, संपतिया देवीने विष पिऊन आत्महत्या केली. मृत महिलेचा पती, मुलगा व सून तिघे फरार आहेत. संपतिया देवी आपल्या पती व सुनेमधील अनैतिक संबंधांना विरोध करत होती. तिचे पती बालदेव यादव यांचे आपले सुनेसोबतच अनैतिक संबंध होते. याबाबत ती आपल्या नातेवाईक व गावकऱ्यांना सांगत होती.
कितीही विरोध केला तरी सासरा व सुनेचे संबंध सुरूच होते. हे सहन न झाल्याने महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. मात्र महिलेच्या मुलीने ही हत्या असल्याची तक्रार पोलिसात केली आहे. वडील, भाऊ आणि वहिनी यांनी मिळून आईला विष पाजून ठार केल्याचा आरोप मृत संपतिया देवी यांची मुलगी ललिता हिने केला आहे. मुलीने सांगितले की, जेव्हा तिने या अवैध संबंधाला विरोध केला तेव्हा तिच्या आईला मारहाण करण्यात आली. अनेक वेळा तिला जेवणही दिले जात नव्हते. आईला विष पाजून मारले असून घरातील सर्व लोक पळून गेले आहेत. गेल्या १० वर्षापासून सासरा व सुनेमध्ये अवैध संबंध आहेत.