Viral News : झारखंडमध्ये एका व्यक्तीला साप चावला. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र दवाखान्यात जात असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मात्र, त्याच्या मृत्यूवर कुटुंबीयांचा विश्वास नअसल्याने त्यांनी त्या व्यक्तीचा मृतदेह अनेक रुग्णालयात नेला, मात्र सर्वत्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे त्यांना संगितले. दरम्यान, मृताच्या मुलीने वडिलांना जिवंत करण्यासाठी रुग्णालयात मंत्रोच्चार सुरू केले. मुलीला मंत्रोच्चार करताना पाहून हॉस्पिटलमध्ये लोकांची गर्दी जमा झाली. डॉक्टरांनी तिच्या वडिलांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिला. वडीलांचा मृतदेह घरी घेऊन हनुमान मंदिरात ठेवला तर ते परत जीवंत होतील अशी धारणा मुलीची होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिस देखील रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी मुलीची समजूत काढली आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. ही घटना झारखंड राज्यातील गढवा जिल्ह्यातील घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चिनिया पोलीस ठाण्यांतर्गत गुरु सिंधू चौकात राहणारे शिवनाथ साओ यांचा मुलगा अनिरुद्ध प्रसाद साओ याचा मंगळवारी सर्पदंशाने मृत्यू झाला. घटनेबाबत कुटुंबीयांनी सांगितले की, अनिरुद्ध सोमवारी रात्री घराबाहेर शौच करण्यासाठी बाहेर पडला होता. त्यादरम्यान सापाने त्याच्या पायाला चावा घेतला. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्यांना सदर रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालण्यात नेण्यास सांगितले. कुटुंबीय त्यांना दुसऱ्या दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना मेदिनीनगर रुग्णालयात नेले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
वडिलांचा मृत्यू झाल्यावर कुटुंबीयांचे समाधान न झाल्याने त्यांनी मृतदेह घेऊन तुंबागडा रुग्णालयात नेला. येथे डॉक्टरांनी त्याची तपासणी करून त्याला मृत घोषित केले. त्यानंतरही अंधश्रद्धेपोटी घरच्यांनी त्याला एका मांत्रिकाकडे नेले. या ठिकाणी त्या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुन्हा सदर रुग्णालयात आणण्यात आले. जिथे त्यांची पुन्हा डॉक्टरांनी तपासणी केली. त्यादरम्यान मृताच्या मुलीने सदर हॉस्पिटल गाठले आणि अंधश्रद्धेमुळे वडिलांना जिवंत करण्यासाठी मंत्रोच्चार करण्यास सुरुवात केली. या मंत्राने आपले वडील पुन्हा जीवंत होतील अशी धारणा होती. दरम्यान मुलीला मंत्रपठण करतांना पाहून रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी जेव्हा सदर हॉस्पिटल गाठले आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलगी आरती देवी हिने वडिलांच्या मृतदेहावर पोस्टमॉर्टम करण्यास नकार दिला. जर वडिलांचा मृतदेह घरी नेऊन हनुमान मंदिरात ठेवला तर ते जीवंत होतील अशी मुलीची धारणा होती. पोलिसांनी दवाखान्यात येऊन मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांनी सदर हॉस्पिटलमधून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.
संबंधित बातम्या