Uttar Pradesh Car accident News: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनौ (Lucknow) येथून धक्कादायक माहिती समोर आली. घराबाहेर खेळणाऱ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा अंगावर शेजाऱ्याने घातली कार घातल्याचा प्रकार उघडकीस आली. या घटनेत चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेतील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सरोजनीनगरच्या बिजनौर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, जिथे घराबाहेर खेळणाऱ्या एका मजुराच्या मुलाच्या अंगावर शेजारच्या तरुणाने कार घातली. कारच्या चाकाखाली आल्याने चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेची माहिती मिळताच बिजनौर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. लखनौ पोलिसांनी अधिकृत ट्विटर हँडलद्वारे या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी मंगळवारी लखनौ येथे एका अल्पवयीन मुलाने दोन महिलांना कारने चिरडल्याची घटना घडली. ही घटना निशातगंज येथील पेपर मिल कॉलनी परिसरातील आहे, जिथे उलट्या दिशेने कार चालवणाऱ्या मुलाने दोन महिलांच्या अंगावर कार घातली. त्यानंतर दोन्ही महिला जवळपास २०० मीटरपर्यंत फरफटत गेल्या. घटनेच्या वेळी कार दोन दुचाकींना धडकून एका दुकानात शिरली. कार दुकानाला धडकल्यानंतर त्यामधील एअर बॅग उघडली, ज्यामुळे मुलाचा जीव वाचला.
नाशिक- दिंडोरी मार्गावरील ढकांबे गावाजवळ कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना म्हसरूळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, या घटनेतील मृतांचे मृतदेह नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या