मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fastag KYC: फास्टॅग वापरणाऱ्यांना दिलासा! सरकारने वाढवली केवायसी अपडेट करण्याची मुदत

Fastag KYC: फास्टॅग वापरणाऱ्यांना दिलासा! सरकारने वाढवली केवायसी अपडेट करण्याची मुदत

Feb 01, 2024 10:11 AM IST

Extended fastag kyc till 29 february 2024 : तुम्ही जर अजूनही फास्टॅगचे केवायसी केले नसेल तर तुमच्यासाठी आत ही शेवटची संधि आहे. सरकारने केवायसी करण्याची मुदत वाढवली आहे. २९ फेब्रुवारी पर्यंत ही मुदत देण्यात आली आहे.

Extended fastag kyc till 29 february 2024
Extended fastag kyc till 29 february 2024

fastag kyc update : एक्सप्रेसवे-नॅशनल हायवे, तसेच महामार्गावरून जाणाऱ्यांना टोल भरण्यासाठी दोन दिवसांत फास्टॅग अपडेट करणे अनिवार्य आहे. या सरकारने ३१ जानेवारी ही अंतिम मुदत दिली होती. मात्र, अनेकांनी या मुदतीत केवायसी अपडेट केलेले नाही. त्यामुळे सरकारने त्यांना काळ्या यादीत न टाकता आणखी एक संधि दिली आहे. सरकारने फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची मुदत वाढवली आहे. आता वाहनधारकांना २९ फेब्रुवारी पर्यंत फास्टॅग अपडेट करता येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Police Bharti 2024 : तयारीला लागा! राज्यात होणार मेगा पोलिस भरती; तब्बल १७,४७१ पदे भरली जाणार

फास्टॅग केवायसी करण्यासाठी आत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. फास्टॅगचे केवायसी आत नागरिकांना २९ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करता येणार आहे. टोलनाक्यावरील कोंडी कमी करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक टोल गोळा करणाऱ्या प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ‘एक वाहन, एक फास्टॅग’ उपक्रम देशात राबवला जाणार आहे. त्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) स्पष्ट केले आहे की आता एका वाहनावर फक्त एक फास्टॅग वापरला जाईल. हा फास्टॅग अपडेट करणे आवश्यक आहे. ज्या वाहनधारकांनी फास्टॅग केवायसी अपडेट केलेल नाही, त्यांना आत नव्या मुडतवाढीनुसार २९ फेब्रुवारी पर्यंत केवायसी अपडेट करता येणार आहे. मात्र, जर काळ्या यादीत जाण्यापासून वाचायचे असेल तर २९ फेब्रुवारीपूर्वी हे बदल करणे गरजेचे राहणार आहे. २९ फेब्रुवारीनंतर फास्टॅग केवायसी अपडेट केले नसेल तर त्यांना टोल प्लाझातून पुढे जाऊ दिले जाणार नाही.

Ajit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट; मुंबई पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट सादर

NHAI अधिकाऱ्यांनुसार, नियमांनुसार फास्टॅग घेणाऱ्या व्यक्तीचे केवायसी अपडेट केले असावे. अशा स्थितीत गाडीही त्या व्यक्तीच्या नावावर असावी. सुरुवातीला, वाहन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असले तरी, फास्टॅग जारी करणाऱ्या व्यक्तीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पुढे जाऊन वाहन, फास्टॅग आणि केवायसीची माहिती ही एकाच व्यक्तीची असणे बंधनकारक केले जाणार आहे.

जर कोणी टोल न भरता पुढे गेला, तर टोल एजन्सी ज्या बँकेच्या वाहनावर फास्टॅग लावलेला असेल त्या बँकेकडे फास्टॅग क्रमांकाच्या आधारे संबंधित टोल शुल्क कपात करणार आहे.

असे करा फास्टॅग अपडेट

सर्व प्रथम https//fastag. ihmcl.com/ वर जा. या ठिकाणी तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा. यानंतर डॅशबोर्ड मेनूमध्ये My Profile हा पर्याय उघडा. माय प्रोफाइल पर्यायामध्ये केवायसीवर क्लिक करा. केवायसी पूर्ण नसल्यास केवायसी उप-विभागात जा, जिथे आवश्यक माहिती जसे की आयडी पुरावा, पत्ता पुरावा आणि फोटो सबमिट करा. यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग