fastag kyc update : एक्सप्रेसवे-नॅशनल हायवे, तसेच महामार्गावरून जाणाऱ्यांना टोल भरण्यासाठी दोन दिवसांत फास्टॅग अपडेट करणे अनिवार्य आहे. असे न करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. ३१ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहनधारकांना फास्टॅगचे 'नो युवर कस्टमर (केवायसी) अपडेट करावे लागणार आहे. फास्टॅग अपडेट करण्याची ही सुविधा ॲपसोबत ऑनलाइन देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) स्पष्ट केले आहे की आता एका वाहनावर फक्त एक फास्टॅग वापरला जाईल. हा फास्टॅग अपडेट करणे आवश्यक आहे. ज्या वाहनधारकांनी फास्टॅग केवायसी अपडेट केलेल नाही, त्यांना १ फेब्रुवारीपासून काळ्या यादीत टाकले जाणार आहे. १ तारखेनंतर देखील केवायसी अपडेट करता येणार आहे. मात्र, जर काळ्या यादीत जाण्यापासून वाचायचे असेल तर १ 1 फेब्रुवारीपूर्वी हे बदल करणे गरजेचे राहणार आहे. जर, १ फेब्रुवारी पूर्वी फास्टॅग केवायसी अपडेट केले असेल तर त्यांना टोल प्लाझातून पुढे जाऊ दिले जाणार नाही.
दरम्यान, NHAI च्या या निर्णयानंतर काही वाहन धारकांनी त्यांच्या मोबाईल नंबरवर फास्टॅग उपडेट केल्यामुळे गोंधळ उडाला आहे. विशेषत: नवीन वाहन खरेदी करताना त्याचा नंबर द्यावा लागत नाही. अशा परिस्थितीत फास्टॅग सेवा देणाऱ्या कंपन्या मोबाईल नंबरवरच वाहनाच्या श्रेणीनुसार फास्टॅग जारी करतात. म्हणजेच, जर ग्राहक कार घेत असेल तर त्याला चारचाकी वाहन मिळत असेल आणि जर कोणी १० टायर ट्रक घेत असेल तर त्याला व्यावसायिक श्रेणीमध्ये फास्टॅग जारी करण्यात येतो.
देशात असे लोक मोठ्या संख्येने आहेत ज्यांची गाडी दुसऱ्या नावाने घेतली आहे, तर फास्टॅग दुसऱ्याच्या नावाने घेतला आहे. तसेच हा फास्टॅग मोबाईल नंबरवरून घेतला गेला आहे.
NHAI अधिकाऱ्यांनुसार, नियमांनुसार फास्टॅग घेणाऱ्या व्यक्तीचे केवायसी अपडेट केले असावे. अशा स्थितीत गाडीही त्या व्यक्तीच्या नावावर असावी. सुरुवातीला, वाहन दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असले तरी, फास्टॅग जारी करणाऱ्या व्यक्तीने केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. पुढे जाऊन वाहन, फास्टॅग आणि केवायसीची माहिती ही एकाच व्यक्तीची असणे बंधनकारक केले जाणार आहे.
जर कोणी टोल न भरता पुढे गेला, तर टोल एजन्सी ज्या बँकेच्या वाहनावर फास्टॅग लावलेला असेल त्या बँकेकडे फास्टॅग क्रमांकाच्या आधारे संबंधित टोल शुल्क कपात करणार आहे.
सर्व प्रथम https//fastag. ihmcl.com/ वर जा. या ठिकाणी तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि OTP च्या मदतीने लॉगिन करा. यानंतर डॅशबोर्ड मेनूमध्ये My Profile हा पर्याय उघडा. माय प्रोफाइल पर्यायामध्ये केवायसीवर क्लिक करा. केवायसी पूर्ण नसल्यास केवायसी उप-विभागात जा, जिथे आवश्यक माहिती जसे की आयडी पुरावा, पत्ता पुरावा आणि फोटो सबमिट करा. यानंतर सबमिट ऑप्शनवर क्लिक करा.
तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फास्टॅग जारी केलेल्या कोणत्याही कंपनीचे फास्टॅग वॉलेट ॲप डाउनलोड करा. त्यानंतर फास्टॅगमध्ये प्रविष्ट केलेल्या मोबाइल नंबरसह लॉगिन करा आणि नंतर माय प्रोफाइलवर जा, जिथे केवायसी वर क्लिक करा. यानंतर तुमचे केवायसी अपडेट झाले आहे का ते तपासा. केवायसी अपडेट न केल्यास केवायसी फिल पर्यायावर क्लिक करा आणि योग्य ती माहिती भरा.