Farooq Abdullah statement on Indian Army: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूकअब्दुल्लायांनी भारतीय सैन्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. त्यांनी दहशतवाद्यांपासून सुरक्षेसाठी तैनात सुरक्षा दलांनी आरोप केला आहे की, ते दहशतवाद्यांशी मिळाले आहेत. नॅशनल कॉन्फरसन्सच्या नेत्यांनी आरोप केला की, भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये संगनमत आहे.अब्दुल्ला यांनी सवाल उपस्थित केला की, एलओसीवर जवान तैनात असताना दहशतवादी घुसखोरी करण्यात यशस्वी कसे होतात.
जम्मू काश्मीरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना फारुख अब्दुल्ला यांनी नवा वाद निर्माण करताना म्हटले की, आज आपल्या सीमांवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात आहेत. कदाचित जगातील सर्वात मोठी डिप्लॉयमेंट आहे. मात्र तरीही आपल्या देशात दहशतवादी घुसतात आणि आम्हाला मारून जातात. भारतीय सैन्यावर गंभीर आरोप करत त्यांनी म्हटले की, दहशतवाद्यांसोबत त्यांचे संगनमत आहे. त्यांना आमचा विनाश हवा आहे, म्हणूनच ते हा खेळ खेळत आहेत.
अनंतनागमध्ये शनिवारी दुपारी झालेल्या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत २ जवान शहीद झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांचे हे वक्तव्य आले आहे. या चकमकीत लष्कराच्या दोन जवानांसह एका नागरिकाचाही मृत्यू झाला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर माहितीच्या आधारे लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी अनंतनागच्या अहलान भागात शोध मोहीम सुरू केली होती. या भागात दोन दहशतवादी लपल्याची बातमी आली होती.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार अनंतनागमध्ये शोधमोहिमेमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर ही चकमक झाली. या एन्काउंटरमध्ये लष्कराला मोठे नुकसान सोसावे लागले होते. यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
राज्यात विधानसभेच्या निवडणुका कधी होणार, यावर फारूकअब्दुल्लायांनी म्हटले की, जम्मूकाश्मीरमधील वातावरण १९९६ च्या तुलनेत चांगले आहे. जर त्या काळात निवडणुका होऊ शकत होत्या तर आता का नाही? जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा प्रदान केला पाहिजे. या निवडणुकीत एनसीआघाडी करून निवडणुकीत उतरणार का, यावरफारूकअब्दुल्लायांनी म्हटले की, त्यांचा पक्ष स्वबळावर निवडणून लढेल.