मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Farmer Protest news : शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’; सीमांवर कडक बंदोबस्त, रेल्वे, मेट्रोची कसून तपासणी

Farmer Protest news : शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’; सीमांवर कडक बंदोबस्त, रेल्वे, मेट्रोची कसून तपासणी

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Mar 06, 2024 01:47 PM IST

आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज 'दिल्ली चलो'ची घोषणा दिली आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेशापासून रोखण्यासाठी पोलिसांनी आयएसबीटी काश्मिरी गेट, आनंद विहार आणि सराय काले खान येथील आंतरराज्य बस स्थानकांवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

The Delhi Police said it will be keeping a strict vigil at the Tikri, Singhu, and Ghazipur borders, as well as railway and Metro stations and bus stands. (ANI)
The Delhi Police said it will be keeping a strict vigil at the Tikri, Singhu, and Ghazipur borders, as well as railway and Metro stations and bus stands. (ANI)

आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीत मार्चोसाठी येऊ पाहणाऱ्या पंजाबच्या शेतकऱ्यांना हरयाणा-पंजाबच्या सीमेवर रोखून धरण्यात आलंय. आता या शेतकऱ्यांनी पुन्हा बुधवारी 'दिल्ली चलो'ची घोषणा दिली आहे. शेतकरी दिल्लीत येऊ नये यासाठी पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. आंदोलनामुळे दिल्लीत वाहतूक कोंडीची समस्या होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिल्ली- हरियाणीदरम्यानच्या टिकरी, सिंघू आणि गाझीपूर सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

‘कोणतीही सीमा किंवा मार्ग बंद नसून केवळ वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. दिल्ली शहरातील रेल्वे आणि मेट्रो स्थानके आणि बसस्थानकांवर पोलिसांकडून नजर ठेवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या 'चलो दिल्ली'च्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत' असं दिल्लीचे पोलिस उपायुक्त जिमी चिराम यांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी सिंघू आणि टिकरी सीमेवर उभारलेले अडथळे तात्पुरते हटवले आहे. या सीमेवर पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा बंदोबस्त मात्र अजूनही कायम असून ते चोवीस तास कडक पहारा देत असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

शेतकरी आंदोलन: दिल्लीत सुरक्षा व्यवस्था

  • पंजाबचे शेतकरी रेल्वे आणि बसेस सारख्या सार्वजनिक वाहतुकीने दिल्लीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे दिल्लीतील मेट्रो स्थानके आणि बस स्थानकांवर अतिरिक्त पोलिस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे.
  • दिल्लीत आधीपासून कलम १४४ (जमावबंदी कायद्या) लागू करण्यात आला आहे. दिल्लीत कुठेही सभा घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, असं एका अधिकाऱ्याने सांगितले.
  • दिल्लीतील काश्मिरी गेट, आनंद विहार आणि सराय काले खान येथील आंतरराज्य बस स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

शेतकरी दिल्ली चलो आंदोलन

  • ‘किसान मजदूर मोर्चा’ आणि ‘संयुक्त किसान मोर्चा’ या दोन संघटना या शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत असून देशभरातील शेतकऱ्यांना आज बुधवारी दिल्लीत पोहोचण्याचे आवाहन या संघटनांकडून करण्यात आले होते.
  • शेतकरी नेते सरवनसिंग पंढेर आणि जगजितसिंग डल्लेवाल यांनी रविवारी हे आवाहन केले आहे.
  • पिकांना किमान आधारभूत किमत मिळावी यासाठी कायदेशीर हमी देण्यासह विविध मागण्यांसाठी या दोघांनी १० मार्च रोजी चार तास देशव्यापी रेल रोको आंदोलन पुकारले आहे.
  • गेल्या महिन्यात पंजाब-हरयाणा सीमेवरील खनौरी येथे पोलीस आणि आंदोलक शेतकरी यांच्यात झालेल्या चकमकीत एका २१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता, तर काही जण जखमी झाले होते.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या