शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण! शंभू सीमेवर पुन्हा तणाव, पोलिसांचा शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण! शंभू सीमेवर पुन्हा तणाव, पोलिसांचा शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण! शंभू सीमेवर पुन्हा तणाव, पोलिसांचा शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा

Dec 14, 2024 01:36 PM IST

Farmer Protest near Shambhu border : आज शनिवारी शेतकऱ्यांनी पुन्हा दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी शंभू सीमेवर त्यांना अडवले. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा आणि पाण्याच्या मारा केला.

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण! शंभू सीमेवर पुन्हा तणाव, पोलिसांचा शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा
शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण! शंभू सीमेवर पुन्हा तणाव, पोलिसांचा शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा (HT_PRINT)

Farmer Protest near Shambhu border : हरयाणा पोलिसांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे मोर्चा काढण्यावर ठाम असलेल्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शंभू सीमेवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. दिल्लीकडे निघालेल्या १०१ शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवून त्यांच्यावर अश्रुधुराचा वापर केला. यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले.  याशिवाय पोलिसांनी शेतकऱ्यांवर वॉटर कॅननचा मारा देखील  केला. यापूर्वी ६ आणि ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र,  हरियाणा पोलिसांनी त्यांना सीमेवरच रोखले. पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा वापर केला. या झटापटीत अनेक शेतकरी जखमी झाले होते.

शेतकऱ्यांनी शनिवारी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला.  मात्र सीमेजवळ बॅरिकेड्स लावून हरियाणा पोलिसांनि आंदोलक शेतकऱ्यांना  मध्येच रोखले. यावेळी आंदोलन चिघळून त्याला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली तर पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. यात काही आंदोलक जखमी झाले आहेत. दरम्यान,  शेतकरी नेते  आणि प्रशासन यांच्यात संवाद झाला. शेतकरी नेत्यांनी सांगितले की ते देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि आपल्या मागण्या सरकारकडून मान्य करून घेण्यासाठी त्यांना  राजधानीत दिल्लीत जायचे आहे.  शांततेच्या मार्गाने पंतप्रधानांसमोर आपल्या समस्या व प्रश्न मांडून त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या आहेत. 

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रशासनाने शेतकऱ्यांना सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचेही पालन करण्यात येत असल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आंदोलंन शेतकऱ्यांना सांगितले. शेतकऱ्यांना दिल्लीला जायचं असेल तर त्यांनी आधी राजधानीत आंदोलन करण्याची परवानगी घ्यावी व  त्यानंतर पोलीस त्यांना दिल्लीत जाण्याची परवानगी देतील. दरम्यान शेतकऱ्यांनी देखील  पाणी आणि अश्रुधुरापासून वाचण्यासाठी उपाय योजना केली आहे. पाण्याचा तीव्र प्रवाह टाळण्यासाठी शेतकरी ओले कपडे व पोत्यांचा वापर करत आहेत.

काही आंदोलक शेतकरी जखमी 

मिळालेल्या माहितीनुसार, या झटापटीत काही शेतकरी जखमी झाले आहेत. त्यांना दावखण्यात भरती करण्यात आले आहे.  एमएसपीसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी बऱ्याच दिवसांपासून दिल्लीत आंदोलंन करण्यावर ठाम आहेत.  त्याचवेळी मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावले जात नाही. अशा तऱ्हेने शेतकरी फेब्रुवारीपासून शंभू सीमेवर ठाण मांडून बसले आहेत.   आज १०१ शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला. घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस दल आणि प्रसारमाध्यमांचे कर्मचारी उपस्थित आहेत. हरयाणा पोलीस शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी वॉटर कॅननचा वापर करत आहेत. त्याचवेळी आंदोलक शेतकरी  मागे हटायला तयार नाहीत.  

 

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर