Fact Check : विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आणली आहे का? सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आता मुलांना नोकऱ्या मिळणार का? असाच दावा सोशल मीडियावर केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोत दाखवन्यात आलेले संकेतस्थळ हे सर्व शिक्षा (sarvashikshaabhiyan.com) अभियानाच्या संकेतस्थळाचं मुखपृष्ठ असल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हायरल होणारा हा फोटो पाहिल्यानंतर याची चर्चा होत आहे. यामागचं सत्य नेमकं काय आहे ? खरंच अशी योजना अस्तित्वात आहे का ? या बाबत फॅक्ट चेक करण्यात आलं आहे. यातून सत्य समोर आलं आहे.
पीआयबी फॅक्ट चेकने या व्हायरल दाव्याचे सत्य समोर आणलं आहे. हे संकेतस्थळ बनावट असून या खोट्या दाव्यांपासून सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये एक्सवर पोस्ट करण्यात आले असून व्हायरल होत असलेल्या या वेबसाइटचा भारत सरकारशी काहीही संबंध नाही. सर्व शिक्षा अभियानासंदर्भात अधिकृत संकेतस्थळ (https://samagra.education.gov.in) आहे. त्यामुळे खोट्या साईट पासून लांब राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून अशी कोणतीही योजना आणलेली नाही. जर तुम्ही या फेक वेबसाईटच्या जाळ्यात अडकला तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
असाच आणखी एक दावा सोशल मीडियावर करण्यात आला होता, ज्यात म्हटले होते की, सरकार मुलांना मोफत टॅब देणार आहे. या व्हायरल दाव्याचे सत्य देखील पीआयबी फॅक्ट चेकने केले होते. केंद्र सरकार 'फ्री स्मार्ट टॅब्लेट स्कीम २०२४-२५' अंतर्गत इयत्ता आठवी ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मोफत स्मार्ट टॅब्लेट देणार असल्याचा दावा केला जात असून डिजिटल शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हे केले जात असल्याचे व्हायरल दाव्यात म्हटले होते. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा असून. केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना आणलेली नाही. त्यामुळे फसव्या गोष्टी पासून सावध राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या