पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांच्या सुरू असलेल्या निषेध आंदोलनाच्या समर्थनार्थ आता फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन व इंडियन मेडीकल असोसिएशन उतरली आहे. एफएआयएमएने सोमवारपासून रुग्णालयांमधील देशव्यापी बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन ही एक देशभरातील निवासी डॉक्टरांच्या संघटनांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे. तर आयएमएने १५ ऑक्टोबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाचे आवाहन केले आहे.
एफएआयएमएच्या शनिवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. या संपातून आपत्कालीन सेवा वगळण्यात आल्या आहेत. संघटनेने म्हटले आहे की , पश्चिम बंगालच्या कनिष्ठ डॉक्टरांसोबत पूर्ण एकजुटीने उभे आहेत. आम्ही सर्वानुमते निर्णय घेतला आहे की आता राष्ट्रीय स्तरावर एकत्र येण्याची वेळ आली आहे. आम्ही पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना मागील पत्रात अल्टिमेटम दिला होता.परंतु कोणतीही समाधानकारक कारवाई झालेली नाही. त्यामुळे आम्ही संपाचा निर्णय घेतला आहे.
देशभरातील सर्व निवासी डॉक्टरांच्या संघटना आणि वैद्यकीय संघटनांना सोमवारपासून सुरू होणाऱ्या देशभरातील निवडक सेवा बंद करण्याच्या आमच्या आवाहनात सामील होण्यासाठी विनंती करा असे संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनने कोलकातामधील जूनियर डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशव्यापी उपोषण आंदोलनाची घोषणा केली आहे. IMAकडून म्हटले आहे की, या आंदोलनाचा उद्देश्य कोलकातामधील आर.जी.कर मेडिकल कॉलेज व रुग्णालयात झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडित महिलेसाठी न्यायाची मागणी करणे आहे.
आयएमएने रविवारी एका निवेदनात म्हटले की, देशव्यापी आंदोलनाचे नेतृत्व आयएमए जूनियर डॉक्टर्स नेटवर्क आणि मेडिकल स्टूडेंट्स नेटवर्कद्वारे केले जाईल. देशभरात IMA ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्क (JDN) मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपोषण करतील.
आयएमएने म्हटले की,कोलकातामधील निवासी डॉक्टरआपल्या मागण्यांसाठीआमरणउपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज ९ वा दिवस असून तीन जणांनारुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या आंदोलनाला लोकांचे समर्थन मिळत आहे.