सोशल मीडियावर गेल्या काही दिवसापासून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक न्यूड तरुणी गोंधळ घालताना दिसत आहे. दावा केला जात आहे की, एका एअरपोर्टवर ड्रग्सच्या नशेत या तरुणीने आपले सर्व कपडे काढले व सेक्सची मागणी करू लागली. 'लाइव्ह हिन्दुस्तान' ने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची पडताळणी करत सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
काय आहे व्हिडिओमध्ये?
व्हिडिओमध्ये एक न्यूड तरुणी गोंधळ घालताना दिसत आहे. सुरक्षा रक्षक तिला रोखण्याचा प्रयत्न करत आहे. महिला कधी एखाद्या सुरक्षागार्डच्या अंगावर धावून जाते तर कधी सामान उचलून फेकते. घटनास्थळी खळबळ माजली आहे. मोठ्या मुश्किलीने सुरक्षा रक्षक तिला नियंत्रित करतात.
व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून काय आहे दावा -
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मोठ्या संख्येने लोक व्हिडिओ शेअर करत आहेत. व्हिडिओसोबत लिहिले जात आहे की, ड्रग्सच्या नशेत तरुणीने विमानतळावर गोंधळ घालत आपले सर्व कपडे काढले व प्रवाशांकडे सेक्सची मागणी करू लागली. अनेक लोकांनी याच मेसेजने व्हिडिओ शेअर केला आहे. लोक यावर अनेक प्रकारच्या कमेंट करत आहेत. नग्नता असल्याने हा व्हिडिओ आम्ही शेअर करू शकत नाही.
काय आहे व्हिडिओ मागचं सत्य?
या व्हिडिओची तपासणी केल्यानंतर घटनेचे सत्य समोर आले. आम्ही जेव्हा काही संबंधित कीवर्ड्सने गूगल सर्च केले त्यावेळी काही बातम्या मिळाल्या. आम्ही जमैका ग्लीनर आणि जमैका ऑब्जर्वर दैनिकात प्रकाशित बातम्या पाहिल्या. या बातम्यांमध्ये घटनेबाबत सविस्तर लिहिले आहे. सर्वात आधी पहिले सत्य समोर आले आहे की, हा व्हिडिओ जवळपास ६ महिने जुना आहे. ही घटना या वर्षी जानेवारी महिन्याच्या शेवटी घडली होती. त्याचबरोबर हे सुद्ध समोर आले की, ही घटना मोंटेगो बे येथील संगस्टर इंटरनॅशनल एअरपोर्टवर घडली.
आरोपी एक अमेरिकन महिला होती. तिने एअरपोर्टवर अचानक आपले कपडे काढले व जमिनीवर झोपली. ती महिला आपल्या मित्रासोबत फिजिकल एक्टिव्हिटी करू लागली. चेक आउट काउंटरजवळ त्यांचे हे कृत्य पाहून अन्य प्रवाशी व सुरक्षा कर्मचारी भांबावले. त्यांनी तरुणीला उचलून तिच्या शरीरावर कापड टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती सुरक्षा रक्षकांवर धावली व जोरजोरात ओरडू लागली. ती सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करू लागली. सुरक्षा रक्षकांनी तिला अटक केली. कोर्टात तरुणीने माफी मागितली. कायदेशीर कारवाईसोबतच तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार करण्यात आले.