Fact Check: सरकार प्रत्येक नागरिकाला ४६ हजार ७१५ रुपये देणार? जाणून घ्या व्हायरल पोस्टमागील सत्य
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check: सरकार प्रत्येक नागरिकाला ४६ हजार ७१५ रुपये देणार? जाणून घ्या व्हायरल पोस्टमागील सत्य

Fact Check: सरकार प्रत्येक नागरिकाला ४६ हजार ७१५ रुपये देणार? जाणून घ्या व्हायरल पोस्टमागील सत्य

Dec 02, 2024 12:22 PM IST

Government Scheme: सरकार प्रत्येक नागरिकाला ४६ हजार ७२५ देणार आहे, असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

 सरकार प्रत्येक नागरिकाला ४६ हजार ७१५ रुपये देणार? जाणून घ्या सत्य
सरकार प्रत्येक नागरिकाला ४६ हजार ७१५ रुपये देणार? जाणून घ्या सत्य (Bloomberg)

Sarkari Yojana सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचणे, अगदी सोपे झाले आहे. मात्र, काही समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात, ज्याचा फायदा सायबर गुन्हेगारांना होतो. अशातच सोशल मीडियावर सरकारी योजनेच्या संबंधित माहिती व्हायरल झाली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक नागरिकाला ४६ हजारांहून अधिक रुपये देणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, पीबीआयने या व्हायरल पोस्टमागील सत्यता तपासली आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या नावाने एक पोस्ट व्हायरल होत असल्याची माहिती पीआयबी म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिली. देशातील अनेक कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे, हे लक्षात घेऊन केंद्रीय अर्थ मंत्रालयाने प्रत्येक नागरिकाला ४६ हजार ७१५ रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे', असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आता पीआयबीने हा मेसेज फेक असल्याचे स्पष्ट केले आहे. पीआयबीने लिहिले की, व्हॉट्सअ‍ॅप मेसेजमधील लिंकसह अर्थ मंत्रालयाच्या नावाने गरीब कुटुंबाला ४६ हजार ७१५ रुपयांची आर्थिक मदत देण्याचा दावा केला जात आहे. अधिक वैयक्तिक माहिती मागविण्यात आली आहे. मात्र, हा मेसेज फेक आहे. अर्थ मंत्रालयाने अशी कोणतीही मदत जाहीर केलेली नाही.

बेरोजगार तरुणांना दरमहा साडेतीन हजार रुपये दिले जातील, असा दावा करणारी आणखी एक पोस्ट व्हायरल होत आहे. पंतप्रधान बेरोजगारी भत्ता योजना २०२२ साठी नोंदणी सुरू झाली आहे, या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना दरमहा ३ हजार ५०० रुपये दिले जातील, असा दावा केला जात आहे. या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे, ज्यावर क्लिक करून मोबाईलवरून रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले जात आहे. मात्र, भारत सरकारकडून अशी कोणतीही योजना चालविली जात नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. असे केल्यास आपल्या खात्यातील पैसे गायब होण्याची शक्यता आहे.

तसेच, नागरिकांना सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच, कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास, नागरिक त्यांच्याशी झालेल्या फसवणुकीची तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक १९३० वर कॉल करू शकतात, असेही सांगण्यात आले आहे. सरकारने याआधी १५५२६० हा क्रमांक जारी केला होता, तो बदलण्यात आला आहे. तुमच्यासोबत घडलेल्या कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्याबाबत तुम्ही येथे तक्रार नोंदवू शकता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर