Fact Check : बिहारमधील पाटणा येथील तख्त श्री हरिमंदिरजी पाटणा साहिब गुरुद्वारामधील लंगरमध्ये (Community Kitchen) पंतप्रधान नरेंद्र मोदी भाविकांना जेवण देत असतानाचा फोटो शेअर केला जात आहे. मात्र, मोदींनी जेवण वाढण्यासाठी हातात घेतलेलं भांडं रिकामं होतं असा दावा केला जात आहे. 'बूम'नं लंगरमध्ये मोदी जेवण देत असल्याचे दृश्य पाहिल्यानंतर हा दावा खोटा असल्याचं आढळून आलं.
पंतप्रधानांनी १३ मे २०२४ रोजी तख्त श्री पाटणा साहिब गुरुद्वाराला भेट दिली. हा गुरुद्वारा म्हणजे शीखांचे दहावे गुरू गुरु गोविंद सिंग यांचं जन्मस्थान आहे. त्यामुळं या स्थळाला विशेष महत्त्व आहे. मोदींनी गुरुद्वाराला भेट दिली तेव्हा पगडी घातली होती. तिथल्या लंगरमध्ये त्यांनी सेवा केली. पोळ्या लाटल्या आणि भाविकांना जेवणही वाढलं.
हा फोटो एक्सवर पोस्ट करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'बिग ब्रेकिंग नरेंद्र मोदींचा पर्दाफाश झाला. नरेंद्र मोदी लंगरसेवा करत नाहीत, तर पंजाबमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी फोटोशूट करत आहेत. मोदी जेवण देत आहेत हे बारकाईने पाहा, पण रांगेत बसलेल्या लोकांच्या आधी किंवा नंतर पाहुण्यांच्या ताटात जेवण नाही. सर्व्हिंग स्पून स्पूनमध्ये किंवा सर्व्हिंग ताटात जेवण नाही. पंजाबमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत शीख समाजाची मतं मिळवण्यासाठी ते फक्त फोटोशूटसाठी करत आहेत. मोदी मतं मिळवण्यासाठी काहीही करू शकतात, त्यांना कुणाहीबद्दल काहीही वाटत नाही. भारतात राहणारा एक हृदयहीन आत्मा."
बिहारमधील पाटणा येथील तख्त श्री हरिमंदिर जी पाटणा साहिब गुरुद्वारामधील दृश्ये बूमच्या हाती लागली. त्यात मोदी बादलीतून खीर वाढताना स्पष्टपणे दिसत आहेत. बादली रिकामी असल्याचा खोटा दावा करत हा फोटो शेअर केला जात आहे.
लाइटिंग आणि स्टेनलेस स्टील प्लेट्सवर जेवण सर्व्ह केलं गेलं होतं. व्हायरल व्हिडिओमधून घेतलेल्या स्क्रीनशॉट्समुळं खाद्यपदार्थ ओळखणं कठीण होतं.
एएनआय या वृत्तसंस्थेनं पोस्ट केलेलं मोदी भाविकांची सेवा करतानाचं दृश्य आम्ही तपासलं. यातही ते बादलीतून खीर वाढताना स्पष्ट दिसत आहेत. एएनआयनं १३ मे २०२४ रोजी केलेल्या खालील एक्स पोस्टमध्ये हे पाहता येईल.
याशिवाय लंगरमध्ये अन्न शिजवण्यासाठी गुरुद्वारा व्यवस्थापनाला मदत करतानाही मोदींनी फोटो काढले.
(डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात बूमनं प्रकाशित केलं होतं. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलनं ते पुन्हा प्रकाशित केलं आहे.)