Asaduddin Owaisi photo fact check : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा एक फोटो ऑनलाइन शेअर करण्यात आला आहे. यात ओवेसी यांना प्रभू श्रीरामाची प्रतिमा भेट दिली जात असल्याचं दिसत आहे. त्यावरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे.
मूळ छायाचित्रात ओवेसी यांनी भीमराव रामजी आंबेडकर यांचं छायाचित्र हातात घेतल्याचं 'बूम'ला आढळलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १३ मे २०२४ रोजी मतदान झालेल्या हैदराबाद मतदारसंघातून असदुद्दीन ओवेसी यांनी निवडणूक लढवली होती.
राजकीय नेत्यांना त्यांचे चाहते व कार्यकर्ते वेगवेगळ्या महापुरुषांची छायाचित्रं भेट देत असतात. अशीच एक भेट ओवेसी यांना मिळाली होती. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीची संधी साधून ओवेसी यांना मिळालेल्या त्या भेटीचा फोटो मॉर्फ करून शेअर करण्यात आला आहे. हा फोटो एका हिंदी कॅप्शनसह शेअर केला जात आहे. 'आता आपली धडगत नाही हे जेव्हा कळतं तेव्हा भलेभले लोक लायनीत येतात, अशी कॅप्शन त्या फोटोला देण्यात आली आहे.
बूमने या फोटोवर रिव्हर्स इमेज सर्च केलं असता असदुद्दीन ओवेसी यांनी ७ एप्रिल २०१८ रोजी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून मूळ फोटो पोस्ट केल्याचं आढळलं.
मूळ छायाचित्रात ओवेसी यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र हातात घेतलं असून त्यांच्यासोबत अनेक जण दिसत आहेत.
मोची कॉलनीतील दलितांनी एमआयएम पक्षाचे मुख्यालय दारुस्सलाम इथं एमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची भेट घेतली आणि त्यांच्या भागात (रामनसपुरा आणि बहादूरपुरा विधानसभा मतदारसंघ) विकासकामं केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
मूळ पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
खाली व्हायरल फोटो आणि ओवेसींनी २०१८ मध्ये पोस्ट केलेलं मूळ छायाचित्र यांची तुलना केली आहे.
(डिसक्लेमर: हे वृत्त मुळात बूमने प्रकाशित केले होते. शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून हिंदुस्तान टाइम्स मराठीनं ते पुन्हा प्रकाशित केलं आहे.)
Fact Check : प्रचार सभेत राहुल गांधींच्या हाती असलेली ही चीनची नव्हे तर भारतीय संविधानाची प्रत; फॅक्ट चेक मध्ये उघड
Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य
Fact Check: कर्नाटकात खुलेआम गोहत्या, व्हायरल व्हिडिओ किती खरा? जाणून घ्या सत्य