Viral News: सोशल मीडियावर वेळोवेळी अनेक मेसेज व्हायरल होत असतात. इंटरनेटचे जग जेवढे लोकांसाठी उपयुक्त आहे, तितकेच नुकसानदायकही आहे. सध्या सोशल मीडियावर एक मॅसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मॅसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे ७५ वर्षांवरील वृद्धांना कर भरावा लागणार नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये केंद्र सरकारने मोठी घोषणा केली असून जेष्ठ नागरिकांना कर भरावा लागणार नाही असे लिहिले आहे. 'भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. भारतात पेन्शन आणि इतर योजनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही आणि त्यांना प्राप्तिकर विवरणपत्र भरावे लागणार नाही, असा दावा व्हायरल होत असलेल्या मॅसेजमध्ये करण्यात आला आहे.
सरकारने या व्हायरल मेसेजची सत्यता पडताळून पाहिली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजेच ७५ वर्षांवरील वृद्धांना कर भरावा लागणार नाही, असा कोणताही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. हा मेसेज पोस्ट करत पीआयबी फॅक्ट चेकने लिहिले की, हा खोटा मॅसेज आहे. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, ज्यांचे केवळ पेन्शन आणि व्याज उत्पन्न आहे, त्यांना आयटीआर भरण्यापासून (कलम १९४ पी नुसार) सूट देण्यात आली आहे. कर आकारला तर उत्पन्न आणि पात्र वजावटीची गणना करून विशिष्ट बँकेकडून ती वजा केली जाते. म्हणजेच हा व्हायरल झालेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिकांना करसवलत देण्यासाठी सरकारने कायद्यात बदल केला आहे. नियम ३१, नियम ३१४, फॉर्म व २४० व ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचे बदल: ७५ वर्षे वयोगटातील व्यक्तींना करसवलत मिळविण्यासाठी बँकेत १२- बीबीए अर्ज सादर करावा लागेल. ही बातमी खूप महत्त्वाची असून ती इतरांनाही शेअर करायला हवी. त्यामुळे एखाद्याची संभाव्य फसवणूक टाळता येऊ शकते.
संबंधित बातम्या