मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check : चंद्राबाबू नायडू यांचा ईदनिमित्त नमाज अदा करतानाचा व्हिडिओ जुना; आता होतोय व्हायरल

Fact Check : चंद्राबाबू नायडू यांचा ईदनिमित्त नमाज अदा करतानाचा व्हिडिओ जुना; आता होतोय व्हायरल

Jun 22, 2024 03:25 PM IST

Fact Check : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे ईद निमित्त नमाज पठण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ जुना असून तो नवा असल्याचे भासवले जात आहे.

चंद्राबाबू नायडू यांचा ईदनिमित्त नमाज अदा करतानाचा व्हिडिओ जुना; आता होतोय व्हायरल
चंद्राबाबू नायडू यांचा ईदनिमित्त नमाज अदा करतानाचा व्हिडिओ जुना; आता होतोय व्हायरल

Claim: चंद्राबाबू नायडू यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ते २०२४ मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यानंतर ईदची नमाज अदा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

Fact : व्हायरल होणारा हा व्हिडिओ खोटा आहे. हा व्हिडिओ २०१८ चा आहे.

Fact Check : तेलुगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी २१ जून रोजी आंध्र प्रदेश विधान सभेत पुन्हा एकदा पुनरागमन केले.  त्यांनी मुख्यमंत्री म्हणूनच परत विधान सभेत येईल असा ठाम निर्धार केला होता. तब्बल ३१ महिन्यांनी त्यांनी त्यांचा निर्धार पूर्ण करत मुख्यमंत्री झाल्यावर ते थाटात विधान परिषदेत दाखल झाले. नुकत्याच झालेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या दणदणीत विजय झाला. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सीएम चंद्राबाबू नायडू यांनी ईदनिमित्त  नमाज पाठणात भाग घेत नमाज अदा केल्याचा  व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एका फेसबुक वापरकर्त्याने "चंद्र बाबू नायडू ईदनिमित्त नमाज पठन करत असल्याचा दावा करत १४४५H, (sic)" या मथळ्यासह व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत असा दावा करण्यात आला की, २०२४ च्या आंध्र प्रदेश निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर चंद्राबाबू नायडू हे नमाज पठण करण्यासाठी गेले होते. या व्हिडिओत नायडू हे पारंपरिक मुस्लिम टोपी परिधान करून मुस्लिम बांधवासोबत प्रार्थना करतांना दिसत आहेत. विजयवाडा येथील गांधी म्युनिसिपल स्टेडियममध्ये त्यांनी नमाज अदा केल्याचे पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओवर म्हटले आहे. (संग्रहण)

fact check
fact check

या पोस्ट प्रमाणे आणखी एका एक्स वापरकर्त्याने हाच व्हिडिओ शेअर करत चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री झाल्यावर नमाज पठण केल्याचा दावा केला आहे. पोस्ट करण्यात आलेल्या हा व्हिडिओ ५७ सेकंदाचा आहे. तसेच या व्हिडिओवर एनएनआय या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेचा लोगो देखील आहे. (संग्रहण)

ही पोस्ट येथे पाहता येईल. (संग्रहण)

Fact Check :

हा व्हिडिओ जुना असून चंद्राबाबू नायडू यांच्या बाबत करण्यात आलेला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे न्यूजमीटरच्या फॅक्ट चेक करणाऱ्या टीमला आढळले.

मुख्यतः, व्हिडिओमधील कॅप्शनमध्ये ईद उल फित्रचा उल्लेख करण्यात आला आहे, तर हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या पोस्ट्सचा दावा आहे की हा व्हिडीओ ईद उल अधाचा आहे. हे दोन वेगळे इस्लामिक सण आहेत, जे वर्षात वेगवेगळ्या वेळी साजरे केले जातात. ईद उल फित्र रमजान महिन्याच्या शेवटी तर ईद उल अधा इब्राहिमने देवाच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी आपल्या मुलाचे बलिदान देण्याच्या इच्छे निमित्त साजरा केला जातो.

न्यूज मीटरच्या फॅक्ट चेकमध्ये व्हिडिओच्या रिव्हर्स इमेज सर्चमध्ये असे दिसून आले की मूळ फुटेज एएनआयच्या यूट्यूब चॅनलवर सहा वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ १ मिनिट आणि २८ सेकंदचा असून या व्हिडिओचे शीर्षक आहे 'मुख्यमंत्री नायडू ईद-उल-फितरच्या निमित्ताने आंध्र प्रदेश येथे नमाज अदा करतांना.

हा व्हिडिओ १६ जून २०१९ रोजी एएनआयच्या एक्स हँडलवर पोस्ट करण्यात आल्याचे देखील फॅक्ट चेकमध्ये आढळले. "आंध्र प्रदेश: मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू विजयवाडा येथील गांधी म्युनिसिपल स्टेडियममध्ये #ईदुल फित्र नमाज अदा करतांना." असे हा व्हिडिओ पोस्ट करतांना लिहिण्यात आले आहे.

fact check
fact check

चंद्राबाबू नायडू यांनी यापूर्वी तीन वेळा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते १९९५ ते १९९९ या काळात मुख्यमंत्री होते. यानंतर १९९९ ते २००४ पर्यंत; आणि २०१४ ते २०१९ पर्यंत त्यांनी तीन टर्म मुख्यमंत्री पदाचा भार सांभाळला आहे. या व्हिडिओमध्ये, त्यांनी २०१८ मध्ये त्यांना २०१८ मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असे संबोधण्यात आले. तर त्यांनी १२ जून २०२४ रोजी चौथ्यांदा पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओचे फॅक्ट चेक करतांना न्यूज मीटरच्या टीमने काही कीवर्ड शोधले. यात त्यांना १५ जून २०१८ मधील द सियासत डेलीने दिलेले वृत्त देखील आढळले. यात नायडू ईदच्या प्रार्थनेत सहभागी झाले होते, हे हायलाइट करून ते विजयवाडा येथील मुस्लिम समुदायात ईद उल फित्र साजरा करण्यासाठी सहभागी झाले होते. या वृत्तात नमूद करण्यात आले आहे की, नायडू यांनी सभेला उर्दूमध्ये संबोधित केले आणि समुदायाला नमाज पठण करत शुभेच्छा दिल्या.

त्यामुळे सध्या व्हायरल होणारा व्हिडिओ हा दिशाभूल करणारा आहे हे सिद्ध झाले आहे. सीएम चंद्राबाबू नायडू यांनी ईदची नमाज अदा करतानाचा व्हायरल व्हिडिओ हा २०१८ चा आहे.

 

Claim Review: चंद्राबाबू नायडू यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ते २०२४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर ईदची नमाज अदा करतानाचा दावा करण्यात आला आहे.

claimed By : सोशल मीडिया यूझर

claimed Review by : NewsMeter

claime source : Facebook आणि X

claim fact chek : व्हायरल होणारा व्हिडिओ जुना असून तो दिशाभूल करणारा आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात newsmeter.in ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)

WhatsApp channel
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर