Fact Check: ईव्हीएममधील छेडछाडीमुळे वायएसआर काँग्रेस पक्षाचा पराभव? व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check: ईव्हीएममधील छेडछाडीमुळे वायएसआर काँग्रेस पक्षाचा पराभव? व्हिडिओ व्हायरल

Fact Check: ईव्हीएममधील छेडछाडीमुळे वायएसआर काँग्रेस पक्षाचा पराभव? व्हिडिओ व्हायरल

Newsmeter HT Marathi
Jun 19, 2024 11:06 PM IST

Andhra Pradesh Assembly Elections 2024: ईव्हीएम छेडछाडीमुळे वायएसआरसीपीचा आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचा आरोप करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ईव्हीएम छेडछाडीमुळे वायएसआर काँग्रेस पक्षाचा आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, असा दावा केला जात आहे.
ईव्हीएम छेडछाडीमुळे वायएसआर काँग्रेस पक्षाचा आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभव झाला, असा दावा केला जात आहे.

२०२४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत एनडीएने १६४ (टीडीपी-१३५, जनसेना-२१, भाजप-८) जागा जिंकल्या. तर, पाच वर्षांपूर्वी १५१ जागा जिंकणारा वायएसआर काँग्रेस पक्ष केवळ ११ जागांवर विजय मिळवू शकला. यानंतर सोशलम मीडियावक एक व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत आहे, ज्यात असे सांगितले जात आहे की, ईव्हीएममधील छेडछाडीमुळे वायएसआरसीपी पक्षाचा पराभव झाला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि सीबीआय चौकशीची माागणी केली जात आहे. मात्र, या व्हिडिओमागील सत्य समोर आले असून हा व्हिडिओ तब्बल पाच वर्ष जुना असल्याचे समजत आहे.

एका फेसबूक वापरकरत्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, आंध्र प्रदेशातील लोक २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांबाबत न्याय मागत आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालय किंवा राज्यपालांच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी किंवा फेरमोजणीची विनंती करतो. माझ्यासह आंध्र प्रदेशातील लोक व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी करत आहे. 

Fact Check
Fact Check

यासंदर्भात येथे, येथे आणि येथे पाहू शकतात. या बातमीशी संबंधित अधिक जाणून घेण्यासाठी येथे, येथे आणि येथे क्लिक करा.

या व्हायरल व्हिडिओमागील सत्य जाणून घेतले असता हा व्हिडिओ २०१९ चा असल्याचा समोर आले. हा व्हिडिओ १४ एप्रिल २०१९ रोजी एबीएन तेलुगु यूट्यूब चॅनेलवरील प्रकाशित करण्यात आला. या व्हिडिओच्या हेडिंगमध्ये 'हरी प्रसाद कम्प्लेन्स ऑन इलेक्शन कमिशन ओव्हर व्हीव्हीपॅट', असे लिहिले आहे. हा व्हिडिओ ७ सेकंदाऐवजी ३ सेकंदाचा शेअर करण्यात आले. चौकशीत असे आढळून आले की, प्रश्नातील व्हिडिओ २०२४ च्या आंध्र प्रदेश निवडणुकीशी संबंधित नाही. त्याऐवजी, तो २०१९ चा आहे आणि टीडीपीचा (तेलुगु देसम पार्टी) विचार करतो. हा व्हिडिओ २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील नाही.

निष्कर्ष- ईव्हीएममधील छे छेडछाडीमुळे व्हायएसआर काँग्रेस पक्ष मत गमावली, असा दावा करणारा व्हिडिओ जुना आहे.

(डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात News Meter ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर