मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check: संसदेच्या कामकाजादरम्यान टीएमसी खासदार महुआ मोईत्रा आणि सयानी घोष झोपल्या? सत्य उघड!

Fact Check: संसदेच्या कामकाजादरम्यान टीएमसी खासदार महुआ मोईत्रा आणि सयानी घोष झोपल्या? सत्य उघड!

Jul 02, 2024 10:42 AM IST

Mahua Moitra and Sayani Ghosh Viral photo: टीएमसीचे खासदार महुआ मोइत्रा आणि सयानी घोष यांचा संसदेच्या कामकाजादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टीएमसीचे खासदार महुआ मोइत्रा आणि सयानी घोष यांचा संसदेच्या कामकाजादरम्यानचा फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात आहे.
टीएमसीचे खासदार महुआ मोइत्रा आणि सयानी घोष यांचा संसदेच्या कामकाजादरम्यानचा फोटो चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जात आहे.

Parliament News: संसदेच्या कामकाजादरम्यानचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हायरल फोटोसोबत असा दावा करण्यात आला आहे की, टीएमसी खासदार महुआ मोइत्रा आणि सयानी घोष हे संसदेच्या कामकाजादरम्यान झोपले होते. मात्र, या व्हायरल फोटोमागील सत्य समोर आले असून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये.

राधिका खेडा नावाच्या युजरने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, छान, इंडिया आघाडी संसदेत झोपताना, जनतेने तुम्हाला संसदेत झोपण्यासाठी निवडले आहे का? या हलगर्जीपणामुळे तुम्ही लोक गेल्या १० वर्षांपासून सत्तेबाहेर आहात! किती लाजिरवाणी गोष्ट आहे, देशाच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी तुम्ही लोक झोपले आहात?

ट्रेंडिंग न्यूज

तपासणीत सत्य समोर

या व्हायरल फोटोमागील सत्य जाणून घेण्यासाठी डीएफआरएसी टीमने तपासणी केली. त्यावेळी हा फोटो खोट्या दाव्यासह सोशल मीडियावर व्हायरल केला जात असल्याचे निष्पन्न झाले. व्हायरल फोटोच्या संदर्भात 'संसद टीव्ही'च्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला व्हिडिओ आढळला, ज्यामध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेनेचे यूबीटी खासदार अरविंद गणपत सावंत यांना बोलण्यासाठी आमंत्रित केले होते.

या व्हिडिओमध्ये अरविंद सावंत बोलत असताना महुआ मोईत्रा आणि सयानी घोष या दोघी त्यांना पाठिंबा दर्शवताना दिसत आहेत. दरम्यान, व्हिडिओच्या १ मिनिट ५७ सेकंदाच्या भागाचा स्क्रीनशॉट अशा प्रकारे घेण्यात आला आहे की, महुआ मोइत्रा आणि सयानी घोष या झोपलेल्या दिसत आहेत.

निष्कर्ष: डीएफआरएसीच्या तथ्य तपासणीवरून स्पष्टपणे दिसून आले आहे की, संसदेच्या कामकाजादरम्यान महुआ मोईत्रा आणि सयानी घोष झोपल्या नव्हत्या. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी केलेला दावा दिशाभूल करणारा आहे.

WhatsApp channel
विभाग