५०० रुपयांच्या नोटांवर आता महात्मा गांधींच्या जागी प्रभू श्रीराम? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ५०० रुपयांच्या नोटांवर आता महात्मा गांधींच्या जागी प्रभू श्रीराम? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य

५०० रुपयांच्या नोटांवर आता महात्मा गांधींच्या जागी प्रभू श्रीराम? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य

Jan 16, 2024 11:25 PM IST

500 hundred rupees Note : सोशल मीडियावर श्रीराम आणि अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराच्या फोटोसह ५०० रुपयांच्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे, काय आहे याचे सत्य?

व्हायरल होत असलेला फोटो
व्हायरल होत असलेला फोटो

500 Rupee Note: २२ जानेवारी २०२४ रोजी भारतीय रिझर्व्ह बँक श्रीरामाचा फोटो असणारी ५०० रुपयांच्या नव्या नोटांची सीरीज जारी करणार आहे का? काय आरबीआय प्रभू श्रीराम आणि अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिराचे फोटो ५०० रुपयांच्या नोटांवर छापणार आहे? २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर श्रीराम आणि अयोध्येत बनत असलेल्या राम मंदिराच्या फोटोसह ५०० रुपयांच्या नोटेचा फोटो व्हायरल होत आहे.

महात्मा गांधींच्या जागी प्रभूश्रीरामाचा फोटो -

सोशल मीडियावर भगवान श्रीराम आणि अयोध्येतील श्रीराम मंदिराचे फोटो असणारी ५०० रुपयांची नोट व्हायरल होत आहे. त्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जागी श्रीरामाचा तर नोटेच्या मागील बाजुला लाल किल्ल्याच्या जागी अयोध्येतील राम मंदिराचा फोटो असणारी ५०० ची नोट व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर श्रीरामाचा फोटो असणारी ५०० रुपयांची नोट ट्रेंड करत आहे.

दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रभू श्री रामाचे चित्र असलेल्या ५०० रुपयांच्या नव्या नोटांच्या मालिकेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भगवान श्रीरामाच्या फोटोसह व्हायरल होत असलेली ५०० रुपयांची नोट बनावट असल्याची  माहिती बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. या नोटांबाबत आरबीआयने कोणतीही माहिती दिली नाही. ही खोटी बातमी असल्याचं समोर आलं आहे. आरबीआय ५०० रुपयांच्या नव्या सीरिजच्या नोटा जारी करणार नसल्याचं समोर आले आहे.

पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत वेबसाईटवरही याबाबत काहीच माहिती नाही. ५०० च्या नोटांवरून लाल किल्ल्याचा फोटो हटवण्याबाबत कोणतीच घोषणा दिसून आली आहे.

 

पीआयबीसह अनेक सरकारी वेबसाईट पाहिल्यानंतरही याबाबतच कोणतीच सूचना दिसून आली नाही.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर