Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

Fact Check: शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले, तिकडे बाहेर थांबा; हा व्हिडिओ किती खरा? वाचा

May 03, 2024 06:18 PM IST

Viral Video: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Sharad Pawar and Uddhav Thackeray Viral Video: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ता जितेन गजारिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये शरद पवार उद्धव ठाकरेंना बाहेर थांबण्यास सांगतात. शरद पवारांच्या आवाहनावर उद्धव ठाकरे हात जोडून "ठीक आहे, मी आजूबाजूला आहे", असे बोलताना दिसत आहेत. मात्र, या व्हिडिओचा वेगळाच अर्थ लावण्यात येत आहे. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर काढले, असे अनेकजण दावा केला जात आहे. मात्र, या व्हिडिओमागील सत्य समोर आले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या व्हिडिओमागील सत्य समोर आले. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार काही कारणास्तव उद्धव ठाकरे यांना बाहेर थांबण्याची विनंती करतात. यानंतर उद्धव ठाकरे सरळ भाषेत मी आजूबाजुला आहे, असे बोलतात. परंतु, भाजप नेते या व्हिडिओचा वेगळाच अर्थ लावत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उद्धव ठाकरे यांना स्वाभिमान नाही, अशा प्रतिक्रिया येत आहेत.

Pune Traffic Update : पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! मेट्रोच्या कामासाठी शिमला ऑफिस चौकात वाहतुकीत बदल

मुंबईत येत्या २० मे २०२४ रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव यांच्या नेतृत्वाखालील यूबीटी सेना काँग्रेससह असून या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत घाम फोडण्यासाठी महायुतीचे कडवे आव्हान आहे.

Pune Police : पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची धिंड! हजारहून अधिक अट्टल गुन्हेगारांना पोलिस ठाण्यात उभे करत दिली तंबी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणूक झाली.

महाराष्ट्रात तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान कुठे ?

तिसरा टप्पा (७ मे २०२४): रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.

चौथा टप्पा (१३ मे २०२४): नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड.

पाचवा टप्पा (२० मे २०२४): धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर