fact check : राहुल गांधी यांनी पाहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  fact check : राहुल गांधी यांनी पाहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

fact check : राहुल गांधी यांनी पाहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Logically Facts HT Marathi
Updated Jun 12, 2024 01:40 PM IST

Rahul gandhi viral video fact check : काँग्रेस नेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी पाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काय आहे सत्य?

fact check : राहुल गांधी यांनी पाहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?
fact check : राहुल गांधी यांनी पाहिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी, व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा ९ जून २०२४ रोजी राष्ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना शपथ दिली.

राष्ट्रपती भवनात झालेला हा शपथविधी सोहळा देशभर पाहिला गेला. काँग्रेस नेते राहुल गांधी हे एका कारमध्ये बसून कारमधील स्क्रीनवर नरेंद्र मोदी यांना शपथ घेताना पाहत आहेत असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ X (पूर्वीचे ट्विटर) वर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. 'आज संध्याकाळचं सर्वात सुंदर दृश्य. खटाखट, खटाखट, खटाखटा शपथविधी बघूया, असं एका युजरनं या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. या पोस्टला आतापर्यंत १,३१,००० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहा. इतर पोस्ट येथे, येथे आणि येथे पहा.

राहुल गांधी यांच्याबाबतच्या व्हायरल फोटोचा स्क्रीनशॉर्ट (स्त्रोत - एक्स/स्क्रीनशॉर्ट)
राहुल गांधी यांच्याबाबतच्या व्हायरल फोटोचा स्क्रीनशॉर्ट (स्त्रोत - एक्स/स्क्रीनशॉर्ट)

राहुल गांधी यांचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ एडिटेड आहे. या व्हिडीओमध्ये कारच्या स्क्रीनवर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेताना दाखवण्यात आलेलं फुटेज एडिट करून वेगळं जोडण्यात आलं आहे. प्रत्यक्षात मूळ व्हिडिओमध्ये स्क्रीन बंद आहे आणि राहुल गांधी खिडकीतून इकडं तिकडं पाहत आहेत.

आम्हाला सत्य कसं कळलं?

व्हायरल व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्यावर, आम्हाला आढळलं की राहुल गांधींच्या समोर स्क्रीनवर दिसणारे पंतप्रधान मोदी शपथ घेतानाचे फुटेज २०१९ च्या शपथविधी सोहळ्यातील आहे.

३० मे २०१९ रोजी हिंदुस्तान टाईम्स यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये (येथे संग्रहित), २२ सेकंदांच्या कालावधीत, नरेंद्र मोदी यांनी त्याच मुद्रेत पाहता येऊ शकते. या दरम्यान नरेंद्र मोदींचा शपथविधीचा आवाजही ऐकू येतो, जो व्हायरल व्हिडिओमध्येही जोडला गेला आहे.

व्हायरल व्हिडिओ आणि हिंदुस्तान टाइम्सच्या व्हिडिओची तुलना (स्त्रोत - एक्स/स्क्रीनशॉर्ट)
व्हायरल व्हिडिओ आणि हिंदुस्तान टाइम्सच्या व्हिडिओची तुलना (स्त्रोत - एक्स/स्क्रीनशॉर्ट)

२०१९ च्या शपथविधी समारंभात नरेंद्र मोदी यांनी फिकट तपकिरी रंगाचे जाकीट परिधान केले होते, तर ९ जून २०२४ रोजी झालेल्या सोहळ्यात त्यांनी निळ्या रंगाचे जाकीट परिधान केले होते.

राहुल गांधींच्या व्हिडिओमध्ये काय आहे?

आम्ही संबंधित कीवर्ड वापरून शोधले आणि हा व्हिडिओ १७ एप्रिल २०२४ रोजी राहुल गांधींच्या Instagram खात्यावर (येथे संग्रहित) पोस्ट केलेला आढळला. राहुल गांधींनी व्हिडिओला कॅप्शन दिले होते, "भारताच्या विचारात, भारताच्या शोधात!" हा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक पेजवर (येथे संग्रहित) पोस्ट करण्यात आला होता.

कारमध्ये बसलेल्या राहुल गांधी यांच्या समोरील स्क्रीन बंद असून तिथं काळ्या पडद्याशिवाय काहीही दिसत नसल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ आणि राहुल गांधी यांच्या इन्स्टाग्राम व्हिडिओतील फरक (स्त्रोत - एक्स, इन्स्टाग्राम / स्क्रीनशॉर्ट)
व्हायरल व्हिडिओ आणि राहुल गांधी यांच्या इन्स्टाग्राम व्हिडिओतील फरक (स्त्रोत - एक्स, इन्स्टाग्राम / स्क्रीनशॉर्ट)

 निष्कर्ष

आमच्या आतापर्यंतच्या तपासात हे स्पष्ट झालं आहे की काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक संपादित व्हिडिओ शेअर केला जात आहे. यात त्यांनी पंतप्रधान मोदींचा शपथविधी सोहळा कारमध्ये बसून पाहिला असल्याचा दावा खोटा आहे.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त मुळात Logically Facts ने प्रकाशित केले आहे. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी मराठी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर