Fact Check: राहुल गांधींनी म्हटलं नव्हतं लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान बनणार!, Viral Video चे सत्य आले समोर
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check: राहुल गांधींनी म्हटलं नव्हतं लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान बनणार!, Viral Video चे सत्य आले समोर

Fact Check: राहुल गांधींनी म्हटलं नव्हतं लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान बनणार!, Viral Video चे सत्य आले समोर

Logically Facts HT Marathi
Published May 15, 2024 10:44 PM IST

Rahul Gandhi Viral Video : राहुल गांधींचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ एडिटेड असून मूळ व्हिडिओत राहुल गांधींनी म्हटले होते की, ४ जून २०२४ नंतर (लोकसभा निवडणुकीनंतर) नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान राहणार नाहीत.

राहुल गांधींचा व्हायरल  व्हिडिओ
राहुल गांधींचा व्हायरल व्हिडिओ

सोशल मीडियावर काँग्रेस नेते राहुल गांधींचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. त्यामध्ये ते म्हणत आहे की, ४ जून २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनणार आहेत. व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांना असेही म्हणताना दाखवण्यात आले आहे की,'इंडिया'आघाडीलाउत्तर प्रदेशमध्ये एकही जागा मिळणार नाही.

व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणत आहेत की, "नरेंद्र मोदी हिंदुस्तानचे पंतप्रधान राहणार आहेत. सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो, जी गोष्ट सत्य आहे. ४ जून रोजी नरेंद्र मोदी हिंदुस्तानचे पंतप्रधान राहणार आहेत. तुम्ही हे माझ्याकडून लिहून घ्या. नरेंद्र मोदी जी हिंदुस्तानचे पंतप्रधान बनू शकतात. आम्हाला जे काही करायचे होते, जे काम करायचे होते, जी मेहनत करायची होती केली आहे. आता तुम्ही पाहा आमच्या आघाडीला उत्तर प्रदेशात एकही जागा मिळणार नाही. माध्यमकर्मींकडे इशारा करत राहुल गांधी म्हणाले होते की, हे सुद्धा हसत आहेत. कारण त्यांना माहिती आहे, राहुल गांधी जे बोलत आहे, ते सत्य आहे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार आहे, बस्स  ख़त्म कहाणी.."

हा व्हिडिओ एक्स (आधीचे ट्विटर), फ़ेसबुक आणि यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. एका फ़ेसबुक यूजरने व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शन दिले होते की, राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीतील आपला पराभव स्वीकार केला आहे. या पोस्ट तुम्ही येथे, येथे, येथे, येथे आणि येथे पाहू शकता.

 

 व्हायरल पोस्ट्सचे स्क्रीनशॉट. (सोर्स: एक्स, फ़ेसबुक/स्क्रीनशॉट)
व्हायरल पोस्ट्सचे स्क्रीनशॉट. (सोर्स: एक्स, फ़ेसबुक/स्क्रीनशॉट)

दरम्यान हा व्हिडिओ एडिट केला असून मूळ व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी यूपीतील कानपूरमधील एका सभेला संबोधित करताना म्हटले होते की, नरेंद्र मोदी ४ जून २०२४ रोजी भारताचे पंतप्रधान राहणार नाहीत.

आम्ही सत्य कसे समोर आणले?

व्हायरल व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी आम्ही या भाषणाच्या मोठ्या व्हर्जनचा शोध घेतला. हा व्हिडिओ १० मे रोजी इंडियन नॅशनल काँग्रेसच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केल्याचे आढळले. व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी उत्तर प्रदेश राज्यातील कानपूरमध्ये एका जनसभेला संबोधत करत आहेत.

व्हिडिओ (आर्काइव्ह येथे) मध्ये राहुल गांधी आपल्या भाषणाची सुरुवात इंडिया आघाडी, भारत जोडो यात्रा आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याविषयी भाष्य करत करतात. त्यानंतर५७सेकंदाच्या वेळेत राहुल गांधी म्हणतात की, "बंधू आणि भगिनीनो,सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो, जो गोष्च तुम्हाला हिंदुस्तानमधील मीडिया कधही सांगणार नाही. मात्र ही गोष्ट सत्य आहे. ४ जून २०२४ रोजीनरेंद्र मोदी हिंदुस्तानचे पंतप्रधान राहणार नाहीत. तुम्ही लिहून घ्या, नरेंद्र मोदी जी हिंदुस्तानचे पंतप्रधान बनू शकत नाहीत. आम्हीला जे करायचे होते, जे काम जी मेहनत करायची होती ती आम्ही केली आहे. आता तुम्हा पाहा उत्तर प्रदेशमध्ये आमच्या आघाडीला ५० पेक्षा कमी एकही जागा मिळणार नाही.अन्य राज्यातही आम्ही भाजपला रोखले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून २०२४ रोजी जाहीर होणार आहेत.

राहुल गांधींनी पुढे मीडियाचा उल्लेख करताना म्हटले की,"आता यांचे (मीडियाकर्मी) चेहरे पाहा ते सुद्धा हसत आहेत. कारण त्यांनाही माहिती आहे, की राहुल गांधी जे बोलत आहे, ते सत्य आहे आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनू शकत नाहीत. बस्स ख़तम कहाणी. त्यानंतर इंग्रजीत बोलतात गुड बाय,थँक यू." राहुल गांधींच्या भाषणाचा हा भाग खाली दिलेल्या व्हिडिओमध्ये५७ सेंकदापासून २.४८ मिनिटापर्यंच्या वेळेत ऐकू शकता.

 

यामुळे स्पष्ट होते की, राहुल गांधींनी जोर देऊन म्हटले होते की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान राहणार नाहीत आणि “इंडिया आघाडीला यूपीमध्ये ५० पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही. तर व्हायरल व्हिडिओमध्ये नाही आणि ५० जागा हे शब्द कट केले आहेत. 

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी १० मे २०२४ रोजी कानपूरमध्ये एक संयुक्त रॅली केली होती. 

तसेच राहुल गांधींनी “नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनणार नाहीत, हे १० मे रोजीच कन्नौजच्या सभेतही म्हटले होते. त्याची टिप्पणी व्हिडिओ मध्ये (आर्काइव्ह येथे) १३:३० ते १३:५० च्या वेळेत ऐकले जाऊ शकते.  

निष्कर्ष -

व्हायरल व्हिडिओमध्ये केले गेलेला दावा की, राहुल गांधींनी लोकसभा निवडणुकीत आपला पराभव स्वीकार करत म्हटले की, ४ जून २०२४ रोजी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनतील. खोटे आहे. व्हायरल व्हिडियो एडिटेड असून मूळ व्हिडिओमध्ये राहुल गांधींनी म्हटले होते की, नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान राहणार नाहीत. यामुळे आम्ही व्हायरल दावा खोटा असल्याचे मानतो.

डिस्क्लेमर: ही मूळ बातमी Logically Facts मध्ये प्रकाशित झाली आहे. एचटी मराठीने शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून ही बातमी पुर्नप्रकाशित केली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर