Fact Check: रिकाम्या खुर्च्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हरियाणातील रॅलीचा की पुण्यातील सभेचा?
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check: रिकाम्या खुर्च्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हरियाणातील रॅलीचा की पुण्यातील सभेचा?

Fact Check: रिकाम्या खुर्च्यांचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पंतप्रधान मोदींच्या हरियाणातील रॅलीचा की पुण्यातील सभेचा?

Newschecker HT Marathi
May 21, 2024 01:38 PM IST

PM Narendra Modi Video : पंतप्रधान मोदींच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या राहिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. दरम्यान फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडिओ हरियाणातील रॅलीचा नसून पुण्यातील असल्याचे आढळले आहे.

 पंतप्रधान मोदींच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या राहिल्याचा दावा
पंतप्रधान मोदींच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या राहिल्याचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गेल्या शनिवारी (१८ मे) हरियाणात सभा झाली. पंतप्रधान मोदींच्या रॅलीत खुर्च्या रिकाम्या राहिल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तथापि,आमच्या तपासणीत आम्हाला आढळून आले की, हा व्हिडिओ हरियाणातील नसून, मोदींच्या २९ एप्रिल रोजी पुण्यात झालेल्या सभेतील आहे. मात्र यावेळी व्हायरल झालेला व्हिडिओ रॅलीदरम्यानचा आहे की सभा पार पडल्यानंतरचा आहे हे कळू शकलेले नाही.

१८ मे रोजी पंतप्रधान मोदींनी हरियाणातील अंबाला आणि सोनीपत येथे दोन जनसभांना संबोधित केले. यावेळी त्यांनी राम मंदिर आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय हरियाणातील आप-काँग्रेस आघाडीवरही त्यांनी निशाणा साधला. आप व काँग्रेस देशभरात एकत्र फिरत आहेत आणि पंजाबमध्ये एकमेकांवर हल्ले करत असल्याचे म्हटले.

व्हायरल व्हिडिओ सुमारे २७ सेकंदांचा आहे. या व्हिडिओमध्ये रॅलीत रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत. याशिवाय पीएम मोदींचे भाषण सुरू असल्याचे ऐकू येत आहेत. त्यामध्ये मोदी म्हणत आहेत की, “जब तक मोदी है,इंडी आघाडी वालों की सारी साजिशें नाकाम करता रहेगा. साथियों, कांग्रेस शासन की एक और पहचान रही है. आतंकवादियों को खुली छूट. हम कैसे भूल सकते हैं वो समय जब”.

 

सोशल मीडियावर केला जाणारा दावा
सोशल मीडियावर केला जाणारा दावा

फॅक्ट चेक (Fact Check/ Verification)

व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी बोललेल्या शब्दांच्या मदतीने न्यूजचेकरने गुगलवर सर्च केले. या दरम्यान, narendramodi.in या वेबसाईटवर २९ एप्रिल २०२४ रोजी पीएम मोदींनी पुणे सभेत दिलेल्या भाषणाचा संपूर्ण मजकूर आम्हाला मिळाला.

 

व्हायरल व्हिडिओमध्ये उपस्थित ऑडिओ भाग
व्हायरल व्हिडिओमध्ये उपस्थित ऑडिओ भाग

या मजकुरात व्हायरल व्हिडिओमध्ये उपस्थित ऑडिओ भाग देखील समाविष्ट आहे. पुण्यातील सभेत पंतप्रधान मोदींनी कर्नाटकातील मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला होता. मोदींनी म्हटले होते की, काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत फतवा काढून सर्व मुसलमानांना ओबीसी बनवले. याचे सरकारी सर्कुलर जारी केले. जसे ही एका रात्रीत ओबीसी बनले सकाळी ओबीसींसाठी असणाऱ्या २७ टक्के आरक्षणावर डाका टाकून अर्ध्याहून अधिक माल हडपले. ओबीसी वाले सर्वजण लटकले. मला सांगा देशात असे चालेल का? या इंडी अघाडी वाल्याने कान देऊन ऐकावे.. मोदी अभी जिंदा है. शहजादे जब तक मोदी जिंदा है, धर्माच्या आधारावर आरक्षण दिले जाऊ देणार नाही. देशातील जनता हे होऊ देणार नाही. जर अशी कुणाची इच्छा असेल तर त्यांना या देश राजकीय क्षितीजावरून मिटवून टाकेल. जोपर्यंत मोदी आहे, इंडी अघाडी वाल्यांचे मनसूबे यशस्वी होणार नाहीत.

“साथियों काँग्रेस सत्ताकालाची आणखी एक ओळख राहिली आहे. दहशतवाद्यांना खुली सवलत आम्ही कसे विसरू. जेव्हा दररोज देशात कोठे ना कोठे दहशतवादी हल्ला व बॉम्बस्फोट होत होते. दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्याला रक्तबंबाळ केले होते. जर्मन बेकरी समोर काय झाले होते?” असेही ते पुढे म्हणाले.

आम्हाला या भागाचा व्हिडिओ २९ एप्रिल २०२४ रोजी पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब अकाऊंटवरून लाइव्ह केलेल्या व्हिडिओमध्ये देखील सापडला. सुमारे ३९ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये हा भाग पाहता आणि ऐकता येतो. याशिवाय, व्हायरल क्लिपच्या भागात आम्हाला गर्दीचे दृश्य देखील पाहायला मिळाले, ज्यामध्ये लोक दूरवर बसलेले दिसत होते.

मोदींच्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ
मोदींच्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ

संबंधित कीवर्डच्या मदतीने गुगल सर्च केल्यावर, आम्हाला २९ एप्रिल २०२४ रोजी महाराष्ट्रातील कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेले ट्विट आढळले. या ट्विटमधील व्हिडिओ व्हायरल झालेल्या व्हिडीओतील दृश्यांसारखाच आहे. पुण्यात झालेल्या पीएम मोदींच्या सभेत बहुतांश खुर्च्या रिकाम्या राहिल्याचा दावा रोहित पवार यांनी कॅप्शनमध्ये केला होता.

 

रोहित पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ
रोहित पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ

मात्र,रोहित पवार यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये असलेल्या ऑडिओमध्ये पंतप्रधान मोदींच्या भाषणाचाही समावेश आहे. यावेळी पंतप्रधान मोदी असे म्हणताना दिसले की, “संत समाज सुधारक देश को दिए हैं और आज ये धरती, दुनिया को शानदार इनोवेटर्स दे रही है, टेक एंटरप्रेन्योर दे रही है”.

पंतप्रधान मोदींनी बोललेली ही वाक्ये आम्ही शोधली तेव्हा लक्षात आले की, पुण्यातील या सभेत पंतप्रधानांनी या गोष्टी सांगितल्या होत्या. पीएम मोदी म्हणाले होते की, “साथियों,इस धरती ने महात्मा फुले, साबित्री बाई फुले जैसे अनेक संत समाज सुधारक देश को दिए हैं. और आज ये धरती, दुनिया को शानदार इनोवेटर्स दे रही है,टेक एंटरप्रेन्योर दे रही है. पुणे जितना प्राचीन है, उतना ही फ्यूचरिस्टिक है”.

 

मोदींच्या पुण्यातील सभेतील व्हिडिओ
मोदींच्या पुण्यातील सभेतील व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांची तुलना पुण्यातील रॅलीच्या व्हिडीओशी केली असता आम्हाला अनेक साम्य आढळले,जे तुम्ही खालील चित्रातून समजू शकता.

 

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांची तुलना
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यांची तुलना

आम्ही पंतप्रधान मोदींच्या अंबाला आणि सोनीपतच्या सभांचे व्हिडिओही पाहिले. दरम्यान,दोन्ही रॅलींमध्ये भाषण करताना पंतप्रधान मोदींनी कोणत्याही प्रकारची पगडी घातली नाही,तर पुण्याच्या सभेत त्यांनी स्थानिक पारंपरिक पगडी घातल्याचे आम्हाला आढळले.

 

पंतप्रधान मोदींच्या अंबाला आणि सोनीपतच्या सभांचे व्हिडिओ
पंतप्रधान मोदींच्या अंबाला आणि सोनीपतच्या सभांचे व्हिडिओ

Conclusion

आमच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल झालेला व्हिडिओ हरियाणाचा नसून पुण्यातील पीएम मोदींच्या रॅलीचा आहे. मात्र, व्हायरल झालेला व्हिडीओ पुण्यातील मेळाव्यादरम्यान किंवा नंतर काढण्यात आला होता हे कळू शकले नाही.

(डिस्क्लेमर: हे मूळ वृत्त newschecker ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर