Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Fact Check : पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षासाठी खरंच मागितली मतं? काय आहे व्हायरल व्हिडिओचं सत्य

Boom HT Marathi
May 19, 2024 01:54 PM IST

Narendra Modi Viral Video : काँग्रेस व सपाला मतदान करण्याचे आवाहन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बूमने आपल्या सत्य पडताळणीत समजले की, मूळ व्हिडिओत पीएम मोदी बीजेपीला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे मोदींच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य
काय आहे मोदींच्या व्हायरल व्हिडिओचं सत्य

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये ते म्हणत आहेत की, जर आपल्या कुटूंबातील मुलांचे भले करायचे असेल तर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी (सपा) ला मतदान करा.

बूमने केलेल्या पडताळणीत आढळलं की, व्हायरल व्हिडिओ एडिटेड आहे. दोन मूळ व्हिडिओच्या दोन वेगवेगळ्या भागांना जोडून हा व्हिडिओ बनवला आहे. पीएम मोदींचा हा मूळ व्हिडिओ जून २०२३ मधील आहे. मोदींनी मध्यप्रदेशमधील भोपाळ शहरात 'मेरा बूथ सबसे मजबूत'कार्यक्रमात पक्षातील बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींनी केलेल्या भाषणाचा आहे. आपल्या भाषणात पीएम मोदी भारतीय जनता पार्टी (बीजेपी) ला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत पंतप्रधान मोदी म्हणत आहेत की,"जर तुम्हाला तुमच्या कुटूंबातील मुलांचे भले करायचे असेल तर तुम्ही काँग्रेसला मतदान करा, तसेच दुसऱ्या एका व्हिडिओत मोदी म्हणत आहेत की, तुम्ही सपाला मतदान करा.

एका इंस्टाग्राम यूजरने एक व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, 'Congress party zindabaad'.

 

modi appealing to vote congress
modi appealing to vote congress

अन्य एका यूजरने एक दूसरा व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात मोदी समाजवादी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.

फॅक्ट चेक

बूमने या व्हायरल व्हिडिओतील दाव्याची सत्यता पडताळणीसाठी व्हायरल व्हिडिओशी संबंधित कीवर्ड्सने गूगल आणि फेसबुकवर सर्च केले. त्यावेळी आम्हालाबीजेपी छत्तीसगडच्या फेसबुक पेजवर २७ जून २०२३ रोजी शेअर केलेला एक व्हिडिओ मिळाला. व्हिडिओसोबत #MeraBoothSabseMajboot हॅशटॅग देत याला कॅप्शन दिले की,"जर आपल्या कुटूंबातील मुलांचे भले करायचे असेल तर भाजपाला मते द्या"

नरेंद्र मोदी व्हायरल व्हिडिओ
नरेंद्र मोदी व्हायरल व्हिडिओ

यापासून संकेत घेऊन सर्च केल्यानंतर आम्हाला पंतप्रधान मोदींच्या यूट्यूब चॅनलवर याचे ब्रीफ व्हर्जन मिळाले. पीएम मोदींनी मध्यप्रदेश राज्यातील भोपाळमध्ये' मेरा बूथ सबसे मजबूत' कार्यक्रमात बूथ कार्यकर्त्यांना संबोधित केले होते.

व्हिडिओमध्ये २:००:४६ च्या काउंटरपासून पंतप्रधान मोदी विरोधकांवर हल्ला करताना म्हणाले की, "परिवारच्या नावाने मते मागणाऱ्यांनी आपल्या कुटूंबाचे भले केले, आता तुम्हाला विचार करून ठरवावे लागेल की, तुम्हाला कोणाचे भले करायचे आहे. तुम्हाला गांधी कुटूंबातील मुला-मुलींचा विकास करायचा असेल तर काँग्रेसला मते द्या, तुम्हाला मुलायम सिंह यांच्या मुलाचे भले करायचे असेल तर समाजवादी पार्टीला मते द्या.

त्यानंतर पुढे २:०२:२६ च्या काउंटरपासून पीएम मोदी म्हणतात की, "माझ्या देशवासीयांनो मी बोलते ते लक्ष देऊन ऐका. तुम्हाला तुमच्या मुला-मुलींचे आपल्या नातवांचे आपल्या कुटूंबातील मुलांचे भले करायचे असेल तर भाजपाला मते द्या. 

याच भाषणाचा व्हिडिओ वेगवेगळ्या भागात कट करून व्हिडियो एडिट करून चुकीच्या दाव्यासह व्हायरल केला आहे.

(डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात Boom ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर