Fact Check: कंगना राणावतच्या गालावर उमटली थप्पडेची खूण, व्हायरल फोटोचे सत्य जाणून घ्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check: कंगना राणावतच्या गालावर उमटली थप्पडेची खूण, व्हायरल फोटोचे सत्य जाणून घ्या

Fact Check: कंगना राणावतच्या गालावर उमटली थप्पडेची खूण, व्हायरल फोटोचे सत्य जाणून घ्या

Newschecker HT Marathi
Jun 07, 2024 11:16 PM IST

kangana ranaut news : कंगना राणावतला चंदीगड विमानतळावर एका CISF महिला जवानाने थप्पड मारली. त्यानंतर गालावर उमटलेल्या थप्पडेच्या खुणेचा फोटो व्हायरल होत असून व्हायरल झालेला फोटो कंगना राणावतचा असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र व्हायरल फोटो कंगनाचा नसल्याचे समोर आले आहे.

व्हायरल होत असलेला फोटो
व्हायरल होत असलेला फोटो

हिमाचल प्रदेशमधील मंडीमधून भाजपच्या तिकीटावर नुकतीच खासदार म्हणून निवडून आलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिला चंदीगड विमानतळावर मारहाण झाल्याची घटना समोर आली होती.CISFकॉन्स्टेबल कुलविंदर कौर या महिला जवानाने कंगनाला थप्पड मारली होती. पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील मंड महिवाल या गावातील रहिवासी कुलविंदर कौर यांच्यावर या घटनेनंतर कारवाई करत त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले.

कंगनाला थप्पड मारल्याच्या घटनेनंतर कॉन्स्टेबल कुलविंदर कौरचा एक व्हिडिओही समोर आला आहे,ज्यामध्ये कंगना राणावतने तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी असलेल्या पंजाबमधील महिलांबद्दल पैशासाठी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले असल्याचे वक्तव्य केले होते. कुलविंदरने सांगितले की,तिची आईही आंदोलनकर्त्यांमध्ये होती. याचा राग तिच्या मनात होती.

या प्रकरणानंतर सोशल मीडियावर विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. काही लोक कंगना राणावतच्या बाजूने तर काही लोक कुलविंदर कौरच्या बाजूने वक्तव्य करत आहेत.

दरम्यान,एका गालावर थप्पड मारल्याची खूण असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटो शेअर करताना दावा केला जात आहे की,हा फोटो अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावतचा आहे. अशी X पोस्ट आणि संग्रहण येथे पाहता येईल.

 

हा फोटो कंगनाचा असल्याचा दावा केला जात आहे.
हा फोटो कंगनाचा असल्याचा दावा केला जात आहे.

Courtesy: X@Am_here_DURGA

“दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांबद्दल कंगनाने अपशब्द काढले होते. तो राग मनात ठेवून असलेल्या एका शेतकरी महिलेची मुलगी,जी चंदिगढ विमानतळावरCISFम्हणून तैनात होती,तिने कंगनाच्या कानाखाली जाळ काढला. मातीत राबलेले सैनिकी हात गालावर असा छाप सोडून जातात.”असे दाव्याच्या कॅप्शनमध्ये म्हटलेले आहे.

Fact Check/ Verification

व्हायरल चित्राची पडताळणी करण्यासाठी,आम्हीGoogleरिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने ते शोधले. शोध दरम्यान,आम्हाला ‘Neverholdyourtongue’नावाच्यावेबसाइटवर१२ जुलै २०१५रोजी प्रकाशित झालेल्या लेखात अपलोड केलेले मूळ आणि संपूर्ण छायाचित्र सापडले. तथापि,या फोटोशी संबंधित कोणतीही माहिती लेखात शेअर केलेली नाही.

हाच फोटो कंगनाचा असल्याचे शेअर केले जात आहे.
हाच फोटो कंगनाचा असल्याचे शेअर केले जात आहे.

हे चित्र२००६मध्ये Coolmarketingthinks या वेबसाइटने देखील शेअर केले होते. आम्हाला आढळले की व्हायरल होत असलेले चित्र आणि या चित्रात बरेच साम्य आहे,जे खाली पाहिले जाऊ शकते.

 

Coolmarketingthinks वेबसाईटने शेअर केलेला फोटो
Coolmarketingthinks वेबसाईटने शेअर केलेला फोटो

हा फोटो एका रशियन वेबसाइटनेही शेअर केला होता, पण त्या लेखात फोटोशी संबंधित कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

Conclusion

आमच्या तपासातून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. व्हायरल होत असलेला फोटो अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावतचा नाही.

(डिस्क्लेमर: हे वृत्त मुळात  newschecker ने प्रकाशित केले. ‘शक्ती कलेक्टिव्ह'चा एक भाग म्हणून एचटी डिजिटलने ते पुन्हा प्रकाशित केले आहे.)

 

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर