फॅक्ट चेक : सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारची माहिती व्हायरल होत असते. यातील काही गोष्टी बरोबर असतात. तर, यातील अनेक खोट्या असतात, ज्या नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शेअर केल्या जातात. सध्या सोशल मीडियावर केंद्र सरकार प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देणार असा दावा करणारी पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात निरक्षरांपासून पदवी मिळवलेल्या लोकांसाठी विविध पगाराची नोकरी उपलब्ध असल्याची माहिती आहे.
युट्यूबवरील राजा टेक्नॉलॉजी टिप्स नावाच्या चॅनेलच्या एका व्हिडिओचा हा थंबनेल आहे. या चॅनेलचे जवळपास ४० हजार फॉलोअर्स आहेत. प्रत्येक कुटुंबातील एका सदस्यला केंद्र सरकार नोकरी देणार असल्याचा दावा करण्यात आला. निरक्षरांना २५ हजार, पाचवी उत्तीर्णांना ३० हजार, आठवीसाठी ३५ हजार, दहावीसाठी ४० हजार आणि पदवीधरांना ८० हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. एवढेच नव्हेतर, अवघ्या दोन मिनिटात अर्ज कसा भरायचा? हे देखील व्हायरल पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. या पोस्ट पोस्टला पंतप्रधान मोदींचा फोटोही लावण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या पीआयबी फॅक्ट चेकने व्हायरल दाव्याचे सत्य उघड केले आहे. रझा टेक्नॉलॉजी टिप्स नावाच्या युट्यूब चॅनेलच्या व्हिडिओ थंबनेलमध्ये दावा करण्यात आला आहे की, केंद्र सरकार 'वन फॅमिली वन जॉब स्कीम' अंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देणार आहे. हा दावा खोटा आहे. म्हणजेच केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही, ज्याअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाते. असे बनावट थंबनेल यूट्यूबवर टाकून व्ह्यूज वाढवण्याचा एक मार्ग असल्याचे मानले जात आहे. राजा टेक्नॉलॉजी टिप्स चॅनेलने केलेला नोकरीचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, दोन्ही राज्यात येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काही समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय, हे सायबर गुन्हेगारीचे जाळे देखील असू शकते, यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या