Fact Check: धर्माच्या नावावर मते मागणाऱ्या भाजप नेत्याला चोप? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Fact Check: धर्माच्या नावावर मते मागणाऱ्या भाजप नेत्याला चोप? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

Fact Check: धर्माच्या नावावर मते मागणाऱ्या भाजप नेत्याला चोप? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य

Updated Apr 13, 2024 11:01 PM IST

Madhya Pradesh Viral Video: धर्माच्या नावावर मते मागणाऱ्या भाजप नेत्याला नागरिकांनी चोप दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये धर्माच्या नावावर मतं मागायला गेलेल्या भाजपच्या नेत्याला नागरिकांनी चोप दिल्याचा दावा केला जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये धर्माच्या नावावर मतं मागायला गेलेल्या भाजपच्या नेत्याला नागरिकांनी चोप दिल्याचा दावा केला जात आहे.

Viral Video: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात जमाव एका वाहनावर हल्ला करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये धर्माच्या नावावर मते मागायला गेलेल्या भाजप नेत्याला लोकांनी मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या व्हिडिओमागील सत्य समोर आले आहे. हा व्हिडिओ भाजप नेत्याचा नाही, ओडिशाच्या प्रादेशिक पक्ष बिजू जनता पक्षाचे निलंबित आमदार प्रशांत जगदेव यांचा आहे, जो १२ मार्च २०२२ चा आहे.

दात निघालेला, नखं काढलेला आणि नुसता तोंडानं हवा मारणारा वाघ; किशोरी पेडणेकर यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ १ मिनिट ४० सेकंदाचा आहे. ज्यात जमाव एका वाहनाची तोडफोड करताना दिसत आहे. जमाव वाहनात बसलेल्या लोकांवर हल्ला करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'धर्माच्या नावावर मते मागण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्याला मारहाण केली' असे लिहिले. मात्र, या व्हिडिओमागील सत्य तपासले असता या व्हिडिओशी भाजपचा काहीही संबंध नसल्याची माहिती समोर आली.

Pimpri chinchwad murder : मद्यधुंद अवस्थेत मैत्रिणीवर मित्राने केला बलात्कार! मानलेल्या भावाने केली आरोपीची हत्या

नेमकं प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२२ रोजी खोरधा जिल्ह्यातील बानपूर ब्लॉक ऑफिसमध्ये ब्लॉक अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी गर्दी जमली होती. त्यात अनेक भाजप समर्थकही उपस्थित होते.यावेळी चिल्काचे आमदार प्रशांत जगदेव आपल्या एसयूव्हीमध्ये तेथे पोहोचले आणि त्यांनी गर्दीतून वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, तेथील लोकांनी प्रशांत यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर प्रशांत आणि लोकांमध्ये वाद सुरू झाला. याच वादातून प्रशांतने पोलिसांसह लोकांच्या अंगावर घातली. यावर संतापलेल्या लोकांनी प्रशांत यांच्यावर हल्ला केला.

हल्ल्यात प्रशांत जगदेव जखमी

या घटनेत ७ पोलिसांसह २२ जण जखमी झाले, यामध्ये सुमारे दोन पोलीस गंभीर जखमी झाले. प्रशांत जगदेव यांच्यावरही जमावाने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झाल्यानंतर प्रशांतला उपचारासाठी भुवनेश्वरला पाठवण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी आमदार प्रशांत जगदेव यांच्यावरही आयपीसीच्या अनेक कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर